Top news महाराष्ट्र मुंबई

“अभिनंदन, राज्याचा महसूल घटवून तुम्ही शरद पवारांना चर्चा करायला भाग पाडलंत”

padalkar sharad pawar e1637241685147
Photo Credit- Facebook/ @GopichandMLC & Devendra Fadnavis

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांनी शेवटपर्यंत एकुजटीने लढा दिला यासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. महसूलात घट आणून तुम्ही शरद पवार यांना तुमच्याशी चर्चा करण्यासाठी भाग पाडलंत, असं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी बोलताना पडळकरांनी परविहन मंत्री अनिल परब यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं आहे.

गोपीचंद पडळकर यांनी एक व्हीडिओ जारी करुन महाविकासआघाडी सरकारवर तोफ डागली. एसटी संपाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब सर्व दरवाजे ठोठावत आहेत. त्यापेक्षा तुम्ही आझाद मैदानात जाऊन एसटी कर्मचाऱ्यांशी थेट चर्चा का करत नाही?, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

तसेच गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही त्यांच्या वचनाची आठवण करुन दिली. एखादा मोर्चा मुंबईत आला तर माझा मंत्री त्याला सामोरा जाईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं, असं पडळकरांनी सांगितलं आहे.

आता उद्धव ठाकरे यांनी हा शब्द पाळावा. राज्य सरकारने दोन पावलं पुढे जाऊन एसटी कर्मचाऱ्यांची आपुलकीने समजूत काढावी. एसटी संपावर तोडगा काढावा, असंही गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे.

अनिल परब यांनी स्वत: भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल, जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल, असंही पडळकर म्हणालेत.

दरम्यान, राज्य सरकार तुमच्या मागण्यांविषयी सकारात्मक आहे. मागण्या करण्यात काहीही गैर नाही. पण मागण्या मांडताना कुठपर्यंत जावं, याचं तारतम्य बाळगणं गरजेचं आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

परिवहनमंत्र्यांनीही मागणयांविषयी सकारात्मक भूमिका दाखवली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी या सगळ्याचा गांभीर्याने विचार करत संप मागे घ्यावा, असं शरद पवारांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, सरकारने ‘या’ नियमात केला बदल 

सर्वात मोठी बातमी- ‘वोडाफोन आयडिया’वर सरकारची मालकी 

अजूनही लस न घेतलेल्यांनो सावधान; अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

राजेश टोपेंनी तिसऱ्या लाटेबाबत दिली महत्वाची माहिती, म्हणाले ‘जानेवारी अखेरपर्यंत ही लाट…’

“शिवसेना-भाजपमध्ये युती होईल, भाजपने मन मोठं करून