मुंबई | महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद रंगला आहे. राज्यात हनुमान चालिसा, भोंगे यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत आहेत.
शिवसेना नेेते संजय राऊत यांनी पुण्यातील सभेत बोलताना केलेल्या वक्तव्यावरून आता नवा वाद उद्भवला आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे.
राऊतांनी ठाकरे सरकार हे बहुजनांचे सरकार आहे, असं म्हटलं होतं. त्यावर टीका करताना पडळकरांनी राऊतांना धारेवर धरलं आहे.
कदाचित आपण आम्हा बहुजनांना पण आपल्या सारखाच शकुनी काकांचा हुजऱ्या समजत असाल, अशी जहरी टीका पडळकरांनी केली आहे.
तुमच्या प्रस्थापितांच्या काळात राज्यात 135 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली ते बहुजन नव्हते का?, असा सवाल देखील पडळकरांनी राऊतांना केला आहे.
शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, शेतकऱ्यांची विज तोडली, पदोन्नती आरक्षण मातीत घालवलं हे सर्व बहुजन नव्हते का?, असा सवाल पडळकरांनी केला आहे.
सरकार स्थापनेच्या वेळी प्रस्थापितांसोबत न्यायालयाच्या पायऱ्या चढलात पण जेव्हा आम्हा बहुजनांची राजकीय आरक्षणाची वेळ येते तेव्हा तीन तीन निर्णय आमच्या विरोधात येतात, असंही पडळकर म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यात सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर परत एकदा वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकार आता यावर काय निर्णय घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“गुन्हे आणि आरोप फक्त आमच्यावर सिद्ध होतात, इतरांवर ते का सिद्ध होत नाहीत?”
कंटेनरची रिक्षाला जोरदार धडक, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू
Stock Market: शेअर मार्केटमध्ये घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
‘अब चंपाकली मुरझायी हैं’; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा