एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले…

मुंबई | सध्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी आणि राज्य सरकार यांच्यात वाद निर्माण झालेला पहायला मिळत आहे.

एकीकडे मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचं कर्मचारी म्हणत आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकार विलीनीकरणाच्या मागणीसाठी विचार करून निर्णय घेतला जाईल असं सांगित आहे.

एसटी कर्मचारी जिल्ह्यांमध्ये संप करताना दिसत आहे. राज्यातील बंद एसटी आगारांच्या संख्येत वाढ होऊन मंगळवारी त्यांची संख्या 247 पर्यंत पोहोचली. यामुळे प्रवासशांची कोंडी होत आहे. त्यांना प्रवासासाठी अडचणी येत आहेत.

अशातच आता एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ठिकठिकाणी व गावोगावी पोलीस बळाचा वापर करून मंत्रालयाच्या दिशेने चाललेल्या कर्मचाऱ्यांना रोखलं जात आहे. यावरून स्पष्ट होतं की शांततेत लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनात अनिल परबांना उद्रेक घडवायचा आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरुनही पडकरांनी राज्य सरकारवर आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. कठीण परिस्थितीत धीर देण्याचं सोडून कर्मचाऱ्यांना मीडियाद्वारे धमकी देण्याचा प्रकार राज्य सरकारकडून चालू आहे.

पुढे पडळकरांनी म्हटलं की, निजामशाहीमुळे जर कुठल्या कर्मचाऱ्यानं हतबल होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याला जबाबदारी ठाकरे सरकारची राहील.

एसटी कामगारांचा संप चिघळला असून त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या वादात प्रवाशांचे कोंडी होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारनं आत खासगी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या बसेस आणि मालवाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांना प्रवाशांची ने-आण करण्याची परवानगी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘…ते प्रकरण मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करुन दाबण्यात आलं’; मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

मंत्री झालो पण, कोणी नामदार म्हणतच नाही- रावसाहेब दानवे

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 10 हजारांचे झाले इतके कोटी

आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं, सत्याचाच विजय होईल- क्रांती रेडकर 

“इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचं कीर्तन होऊ देऊ नका”