मुंबई | काही दिवसांपूर्वी सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या गाडीवर राष्ट्रवादी- काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. पडळकरांचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी-काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यामध्ये झालेल्या हाणामारी झाली होती. (Gopichand Padalkar’s serious allegations against Jayant Patil)
कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या हाणामारीदरम्यान हा हल्ला झाला होता. त्यानंतर पडळकरांनी राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीवर अनेक आरोप लावले होते.
अशातच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्डिडीओ शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून माझ्या हत्येचा कट आखल्याचा दावा केला आहे. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
माझ्यावर झालेला हल्ला हा सुनियोजित कट असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. हा व्हिडीओ 7 नोव्हेंबर 2021 चा असल्याचं देखील समोर आलं आहे. त्यांच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाल्याचं दिसतंय.
माझी गाडी ज्या दिशेने जात होती, त्यांच्या समोर 200 लोकं त्याठिकाणी जमा होती. लाठी आणि काठी घेऊन हे लोकं उभी होती. त्यांना बघून माझ्या गाडीचा वेग कमी करायचा आणि नंतर माझ्या अंगावर गाडी घालायची असा कट होता, असंही पडळकर म्हणाले आहेत.
या सर्व प्रकारात पोलिसांचा देखील हात असल्याचा आरोप पडळकरांनी केला आहे. या हल्ल्याचे चित्रीकरण करताना काही पोलीसवाले दिसत आहे. हा सर्व कट पोलीस संरक्षणात करण्यात आल्याचं देखील पडळकर म्हणाले आहेत.
दरम्यान, पडळकरांच्या या आरोपावरून आता राजकारणात एकच खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे. या सर्व आरोपावर जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पाहा ट्विट-
जिंदगी तो अपने दम पर ही जी जाती है..
दुसरो के कन्धों पर तो सिर्फ जनाजे उठाये जाते हे…@PawarSpeaks @NCPspeaks pic.twitter.com/9W7bZJ4mRM— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) December 26, 2021
महत्वाच्या बातम्या-
‘… त्यासाठी डोकं आणि अक्कल लागते’; अजित पवारांचा नारायण राणेंना टोला
“जीन्सवाल्या पोरींना पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडत नाहीत, ते…”
…म्हणून या सर्वात मोठ्या महामारीशी आपण सामना करू शकलो- नरेंद्र मोदी
‘…तर मी आमदारकीचा राजीनामा देईल’; चंद्रकांत पाटलांचं खडसेंना आव्हान
रणबीर कपूर हा अजिबात सेक्सी मुलगा नाही, तो आईच्या…- सोनम कपूर