मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जोवर एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात येत नाही तोवर संप मागे घेतला जाणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन केलं होतं. एसटी कर्मचाऱ्यांनी चप्पलफेक करत राज्य सरकार आणि शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती.
या घटनेनंतर राज्यातील राजकारण तापलं होतं. अनेकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला होता. आंदोलनकर्ते एसटी कर्मचारी आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणावरून शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या नुकसानीसाठी शरद पवार जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरावर हल्ला केला नाही. तरीदेखील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु, माझ्या वाहनावर दगडाने हल्ला करून देखील माझ्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
एसटी कर्मचारी तुमच्या घराकडे का आले?, याचा अभ्यास तुम्ही केला नाही. 107 कर्मचारी ज्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत म्हणून शरद पवारांवर गुन्हा दाखल करायला हवा, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शरद पवार हे दुटप्पी भूमिका घेत आहेत. माझ्या गाडीवर ज्यावेळेस हल्ला होतो तेव्हा कार्यकर्त्याच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही आशिर्वाद देतात. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी अनेक आमदारांनी त्यांचं अभिनंदन केलं, असा घणाघात गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयएनएस विक्रांत प्रकरणी सोमय्यांची तीन तास चौकशी, बाहेर पडताच म्हणाले…
“तो येईल भाषण करून जाईल, तुम्ही इतकं महत्त्व देताच कशाला”
मलिकांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाचा मोठा दणका
“जेम्स लेन 20 वर्षे कुठं गेला होता?, गाडलेला राक्षस बाहेर काढू नका”
“…तर हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे”