मुंबई | राज्याच्या राजकारणात प्रभाव असलेल्या नेत्यांमध्ये दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेंच्या नावाचा समावेश होतो. राष्ट्रवादीचे नेते व मुंडेंचे एकेकाळचे सहकारी एकनाथ खडसेंनी मुंडेंच्या आठवणींना उजाळा देताना महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
गोपीनाथ मुंडे आज ह्यात असते तर राज्याचे चित्र वेगळं असतं. गेल्या सात वर्षात जे तुम्हाला अनुभवायला मिळाले ते मिळाले नसते, असं खडसे म्हणाले आहेत.
गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखाली राज्याची प्रगती झाली असती. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार आहेत, असं वक्तव्य यावेळी खडसेंनी केलं आहे.
जळगावमधील गोपीनाथ मुंडे प्रवेशद्वाराचं उद्घाटन धनंजय मुंडेंच्या हस्ते पार पडलं. यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित असताना खडसेंनी मोठं वक्तव्य केलं आहे.
गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सर्वांना सोबत आणलं. अगदी त्याच काळात धनंजय मुंडेंना राजकारणात आणलं, असंही खडसे म्हणाले आहेत.
गोपीनाथ मुंडेंसारखंच धनंजय मुंडे यांनी देखील महाराष्ट्राचं या जनतेचं नेतृत्व करावं, असं वक्तव्य खडसेंनी केलं आहे. परिणामी राज्यात चर्चांना उधाण आलं आहे.
धनंजय मुंडेंनी साऱ्या समाजांना बरोबर घेत राजकारण केलं आहे. हे करत असताना त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या विचारांना मोठं केलं आहे, असंही खडसे म्हणाले आहेत.
दरम्यान, गोपीनाथ मुंडेंच्या काळात भाजपमधील आघाडीचे नेते म्हणून एकनाथ खडसेंची गणना केली जात होती. मात्र मुंडेंच्या निधनानंतर एकनाथ खडसेंनी भाजप सोडली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘सहकाऱ्यांना सोडून पळणारा मुख्यमंत्री नसावा’; भुजबळांचा टोला नेमका कुणाला?
“14 तारखेला अनेकांचा…”; ठाकरेंचा ठाकरे शैलीत विरोधकांना इशारा
“आघाडी सरकारचा बुरखा टराटरा फाडणार” चंद्रकांत पाटील भडकले
सत्ता जाताच मागं लागली साडेसाती! इमरान खान यांच्या अडचणीत वाढ