नवी दिल्ली | सध्या सर्वत्र दिवाळीची धुमधाम चालू आहे. अशातच आता केंद्र सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्यात येणार असल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलं आहे.
केंद्र सरकारने सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी दिवाळीत कर्मचार्यांना मोठं गिफ्ट मिळालं आहे.
केंद्रीय कर्मचारी मोठ्या कालावधीपासून महागाई भत्त्याची मागणी करत होते. 5 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची सुद्धा दखल घेण्यात आली आहे. या महागाई भत्त्याचा लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे.
काही नियमांच्या अधिन राहून हा भत्ता मिळणार आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 7 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचवेळी पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे केंद्रीय स्वायत्त संस्था पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 12 टक्क्यांनी वाढ करण्यात आली.
15 जुलै 2021 पासून ही वाढ प्रभावी मानली जाणार आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, ज्यांना पगार दिला जातो, तो मूळ वेतनाच्या 189 टक्क्यांवरून 196 टक्के करण्यात आलाय.
पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार पगारदार कर्मचाऱ्यांचा डीए 356 टक्क्यांवरून आता 368 टक्के करण्यात आलाय. केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचार्यांच्या डीएमध्ये वाढ करण्यात आल्याचाही केंद्राच्या पत्रकात उल्लेख आहे.
मार्च 2020 मध्ये कोरोनाच्या प्रभावानं अधिकच्या भत्त्यात घट करण्यात आली होती. पण आता सरकरनं हा निर्णय घेतल्यानं लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती गोठवण्यात आल्या होत्या पण आता यात सातत्यपूर्ण वाढ करण्याचा निर्णया केंद्रीय अर्थमंत्रालायनं घेतला आहे.
एकूण तीन टप्प्यात सवलती देण्यात येणार आहेत. थकवण्यात आलेलं भत्ते 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2021, 1 जानेवारी 2021 यामधील होती. या महागाई भत्त्यांना सवलतीनं आता समाविष्ट करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“शिवसेनेच्या कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा, आम्हाला दु:ख वाटण्याचं कारण नाही”
“नवाब मलिक आणि त्यांनी आरोप केलेल्यांची नार्को टेस्ट करा”
पराभवानंतर सुभाष साबने यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही, कोरोनावर एकच उपाय…”
“अशोक चव्हाण यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करणार”