मुंबई | कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षात अनेक सणांवर निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे सरकारवर टीका देखील करण्यात येत होती.
आता कोरोना रूग्णसंख्या कमी झाली असल्यामुळे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, अद्याप काही प्रमाणात नियम पाळावे लागत आहेत.
येत्या 17 तारखेला होळी महाराष्ट्रात साजरी केली जाणार आहे. अशातच होळी आणि धुळवड सणाच्या निमित्ताने गृहखात्याने नवी नियमावली जारी केली आहे.
गृहखात्याने जारी केलेली नियमावली पुढील प्रमाणे-
- रात्री दहाच्या आत होळी साजरी करावी.
- रात्री दहाच्या आत होळी करणं बंधनकारक असून नंतर होळीला परवानगी नाही.
- होळी करताना डीजे- डाॅल्बी लावण्यास देखील परवानगी देण्यात आली नाही.
- डीजे- डाॅल्बी लावल्यास कायदेशीर कारवाई करावी लागेल.
- होळीच्या वेळी मद्यपान आणि गैरवर्तन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
- दहावी आणि बारावीची परीक्षा असल्याने लाऊड स्पिकर लावण्यास देखील मनाई केली आहे.
- कोणत्याही जातीच्या किंवा धर्माच्या भावना दुखावतील, अशा घोषणा करू नये.
- कोणाची इच्छा नसताना जबरदस्तीने रंग आणि पाण्याचे फुगे फोडू नये.
दरम्यान, भारताबाहेर सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने आता भारतात देखील चौथी लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वांनी स्वत:ची काळजी घेणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“सात अजुबे इस दुनिया में, आठवा अजुबा मुख्यमंत्र्यांचं…”
Omicronच्या पाचव्या व्हेरियंटचा जगभर धुमाकूळ; चीनमध्ये लाॅकडाऊन तर भारताचं टेन्शन वाढलं
संसदेत सोनिया गांधींची भाजपवर कडाडून टीका, म्हणाल्या…