मुंबई | भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात यावी, अशी सर्वांची ईच्छा होती. सर्वांचं लक्ष राज्य सरकारच्या निर्णयाकडं लागलं होतं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याच्या गृहविभागाकडून लवकरच मार्गदर्शक सुचना जारी करण्यात येणार आहेत. उद्धव ठाकरेंनी गृहविभागाला याबाबत सुचना दिल्या आहेत.
गेल्या दोन वर्षात आपण सर्वांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करत जयंती आणि महापरिनिर्वाण दिन साजरा केला. आपण सर्वांनी सहनशक्तीनं सर्व पार पाडलं, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले आहेत.
आता कोरोनाचं सावट कमी झालं आहे परिणामी आपण सर्वजण आरोग्याची काळजी घेत उत्साहात महामानवाची जयंती उत्साहात साजरी करूया, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महापरिनिर्वाण दिनाप्रमाणं जयंतीदिवशीही हेलिकाॅप्टरनं पुष्पवृष्टी करण्यास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी परवानगी दिली आहे. आवश्यक त्या सुचना पाळून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
जयंती उत्सवाच्या अनुषंगानं सर्व उपाययोजना या मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येणार आहेत. परिणामी सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी करूया, असंही ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, गत दोन वर्षात कोरोनाच्या कारणानं अनेक जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले नव्हते पण आता कोरोना कमी झाल्यानं सरकार परवानगी देत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“आशिषजी जरा तोंड सांभाळून बोला, अन्यथा…”
Deltacron: चीनमुळे भारताला चौथ्या लाटेचा धोका?, ICMR ने दिला ‘हा’ गंभीर इशारा
काय सांगता! Russia-Ukrain युद्धादरम्यान अमेरिकेनं केली चक्क रशियाला मदत; झालं असं की…
Railway Recruitment 2022: परीक्षेविना रेल्वेमध्ये भरती होणार; 10वी पासही करू शकतात अर्ज
“सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली हे शोधणं महत्त्वाचं”