सरकारची भन्नाट योजना; एकाचवेळी मिळतील 10 लाख

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन (PM Cares) योजनेअंतर्गत सहाय्य रकमेसह शिक्षण आणि वैद्यकीय विम्याची (medical insurance) सुविधा जाहीर केली होती.

ज्या मुलांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) कोरोनाला जागतिक महामारी घोषित केल्याच्या 11 मार्च 2020 या तारखेपासून ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत आपले दोन्ही पालक किंवा एकमेव पालक गमावले आहेत, ते या योजनेसाठी पात्र ठरतील.

यामध्ये कायदेशीर पालक / दत्तक पालक / एकल दत्तक पालक यांचाही समावेश आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी, पालकांच्या मृत्यूच्या तारखेला मुलाचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असावेत.

ज्या मुलांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) कोरोनाला जागतिक महामारी (Corona pandemic) घोषित केल्याच्या 11 मार्च 2020 या तारखेपासून ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत आपले दोन्ही पालक किंवा एकमेव पालक गमावले आहेत, ते या योजनेसाठी पात्र ठरततील.

भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेच्या नोंदणीची तारीख 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2021 होती.

या संदर्भात मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना, महिला आणि बाल विकास, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागांना पत्र लिहिले असून, त्याची एक प्रत सर्व जिल्हा दंडाधिकारी/जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.

सर्व पात्र मुलांची आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेच्या लाभासाठी नोंदणी केली जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या – 

“येत्या काही दिवसांत मोठा खुलासा करणार”, फडणवीसांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ 

माजिद मेमन यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले “नवाब मलिक यांना…”

“आता ईडीसमोर बोल नाहीतर तुझ्या हातात विडी देतील”

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सिलेंडर, सीएनजीसह वीज देखील महागण्याची शक्यता

मोठी बातमी! अटकेच्या कारवाईनंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…