मुंबई | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकारमध्ये वारंवार खटके उडत आहेत.
राज्यपाल आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अनेकदा शाब्दिक युद्ध देखील रंगल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं आहे. अद्यापही हा वाद मिटलेला नाही.
काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयानं राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील वाढत्या दरीवर भाष्य केलं होतं. परिणामी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कोश्यारी आणि ठाकरेंमध्ये अनेक कारणांवरून वाद होत आहेत. अशातच राज्यपालांनी ठाकरे सरकारला मोठा धक्का दिला आहे.
अहमदनगर जिल्हा रूग्णालयात झालेल्या अग्निकांडात राज्य सरकारनं जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करण्याचा आदेश काढला होता.
राज्य सरकारचा हा निर्णय राज्यपालांनी आपला विशेषाधिकार वापरत रद्द केला आहे. डाॅ. सुनिल पोखरणा यांचं निलंबन रद्द केल्यानं राज्यात नवा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
पोखरणा यांची नियुक्ती आता पुणे जिल्ह्यातील शिरूर ग्रामीण रूग्णालयात अधिक्षक म्हणून नेमणूक देण्यात आली आहे. तसे आदेशही राज्यपालांनी काढले आहेत.
6 नोव्हेंबर 2021 मध्ये अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील कोरोना अतिदक्षता रूग्णालयात आग लागली होती. या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, राज्यपालांच्या या निर्णयानं राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये जोरदार संघर्ष निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सर्वात मोठी बातमी; कोरोनाबाबत WHO चा जगाला अत्यंत गंभीर इशारा
अत्यंत महत्त्वाची बातमी; LPG सिलेंडरच्या दरात झाला मोठा बदल
बालात्काराचा आरोप असलेल्या शिवसेना नेत्याचे खळबळजनक कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल!
“‘द कश्मीर फाइल्स’चं काय, ‘ठाकरे’ सिनेमाही आम्ही महाराष्ट्रात टॅक्स फ्री केला नव्हता”