Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

राज्यपाल एकनाथ खडसे यांचा आमदारकीचा अर्ज नाकारणार?

मुंबई | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. नुकतंच भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. एकनाथ खडसे यांच्याबरोबरच जवळपास 72 नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

सध्या महाराष्ट्र विधानसभेच्या राज्यपाल नियुक्त 72 सदस्यांच्या जागा रिकामी आहेत. या जागांची भरती एप्रिलमध्येच करण्यात येणार होती. मात्र, कोरोना महामा.रीमुळे याची तारीख पूढे ढकलली असून लवकरच या जागांवर सदस्यांची नेमणूक केली जाईल. राष्ट्रवादीच्या वाट्याला या जागेतील 4 जागा असल्यानं एका जागेवर एकनाथ खडसे यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत दिले जाईल, अशा चर्चा सध्या चालू आहेत.

मात्र एकनाथ खडसे यांना विधानसभेच्या सदस्यपदी नेमलं जाऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. अंजली दमानिया यांनी काल महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. यानंतर अंजली दमानिया यांनी स्वतः माध्यमांशी संवाद साधला आणि ही माहिती दिली आहे.

यावेळी त्या म्हणाल्या की, राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी महाविकास आघाडी सरकार कडून 12 नावे देण्यात येणार आहेत. त्यातलं एक नाव एकनाथ खडसे यांचं असल्याचं प्रसारमाध्यमांमध्ये समजत आहे. मात्र, खडसे यांच्यासारख्या भ्र.ष्ट नेत्याचं नाव येणं संतापजनक आहे. राष्ट्रवादी भ्र.ष्टाचारी नेत्याला पुन्हा राजकारणात आणू पाहत आहे. त्यांच्या विरोधात निवेदन देण्यासाठी मी राज्यपालांची भेट घेतली आहे.

जर एकनाथ खडसे राजकारणात आले आणि पून्हा सक्रिय झाले तर भ्र.ष्टाचार विरोधी लढ्याला काहीच अर्थ राहणार नाही. त्यामुळे मी काही कागदपत्रे आणि निवेदने राज्यपालांना दिली आहेत, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

तसेच राष्ट्रवादी प्रवेशावेळी एकनाथ खडसे यांनी ‘बाई दिली नाही तर मागे लावली’, असं विधान केलं. हे विधान शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अनिल देशमुख असताना केलं गेलं. एकनाथ खडसे यांना काही लाज आहे की नाही? असा सवालही दमानिया यांनी केला आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची कन्या रोहिणी खडसे आणि पत्नी मंदाकिनी यांनी देखील हातावर घड्याळ बांधलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा पक्षप्रवेश झाला. खडसे यांच्यासह तब्बल 72 नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

नंदुरबार तळोद्याचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, बोदवडचे कृषी उत्पन्न बाजार सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगरचे सभापती प्रल्हाद जंगले, बोदवडचे सभापती किशोर गायकवाड, भुसावळचे सभापती मनिषा पाटील या नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अखेर सलमान खान विवाह बंधनात अडकला! पाहा कोण आहे सलमानची पत्नी?

सुशांत प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट! आता अंकिता लोखंडेवरच ‘या’ प्रकरणी कारवाई होणार?

आणखी एका बड्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा! म्हणाली घा.णेरडे चाळे करत ‘ते’ लोक…

पंकजा मुंडे यांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य म्हणाले…

दिवाळीत फटाके फोडू नका; ‘या’ कारणामुळं तज्ज्ञांनी दिला सर्वात मोठा इशारा