“राज्यपालांनी हे ठाकरे सरकार बरखास्त करावं”

सांगली | राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं.

सरकारच्या निर्णयावर संभाजी भिडेही यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावं, अशी थेट मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे.

राज्य सरकारचा हा निर्णय चुकल्याचं स्पष्ट मत संभाजी भिडे यांनी मांडलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे तरुणाई व्यसनाच्या विळख्यात जाईल असं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं आहे.

चरस गांजा उत्पन्न करण्यासाठी हा समाज पुढे येईल. या प्रकरणी मुख्यमंत्री यांच्याशी आणि पूर्ण मंत्रिमंडळात बोलणार आहे. हा घेतलेले निर्णय समजून सांगणार आहे. राज्याने असलं बोलायचं नसतं. समाजाला आपण दिशा द्यायची असते. हा निर्णय संताप जनक, नाश करणारा निर्णय आहे, असं ते म्हणालेत.

मला भिमाची आठवण होते. जुगाराचे नादापायी शकुनी मामांनी सगळं हरण केलं. पांडव सगळं हरले. बेशरम पणाने व्यसनाच्या आहारी जाऊन पत्नीला पणाला लावले, असंही ते म्हणाले आहेत. आर आर आबांनी डान्स बार बंद केले. आज आर आर आबा असते तर हा घातकी नीच निर्णय झाला नसता, असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांचे सरकार खरोखरच चांगले आहे. भगवंताची कृपा म्हणून मिळालेले पंतप्रधान आहेत. लाल बहादूर शास्त्री जसे अफाट चांगले होते. तसेच नरेंद्र मोदी आहेत. त्याचे मन मी जाणतो. त्यांनी खरोखर देशातील दारूला तिलांजली देणारा निर्णय लोकसभेत घटनेत दुरुस्ती करून घ्यावा, असंही संभाजी भिडे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या- 

माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नातीची आत्महत्या, हे कारण आलं समोर 

 भय्यू महाराज प्रकरणाला नवं वळण; अत्यंत धक्कादायक माहिती समोर

“मिस कॉल देऊन जगातला मोठा पक्ष व्हायचं नाही”; नानांचं भाजपवर टीकास्त्र

  “…त्यावेळी भारतीय क्रिकेट कणाहीन बनेल”; रवि शास्त्रींचं मोठं वक्तव्य

अखेर समंथा नागा चैतन्यच्या घटस्फोटावर नागार्जुनने सोडलं मौन, म्हणाला “समंथाला…”