महाराष्ट्र मुंबई

सावधान! घरात दुचाकी असेल तर तुमचं रेशनकार्ड रद्द होणार…

मुंबई | राज्य सरकारच्या अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्याचं वितरण करण्यात येतं. पण ज्याचं उत्पन्न वाढलं आहे, त्यांचं रेशनकार्ड रद्द करून नवीन लाभार्थ्यांना जोडण्यात येणार आहे. 

राज्यात आधार कार्ड लिंक झालेले जवळपास दीड कोटींपेक्षा अधिक रेशनकार्ड धारक आहेत. यातील अनेकांच्या शिधापत्रिका लवकरच रद्द होणार आहेत. त्यांचं स्वस्त धान्य दुकानातून मिळणारं धान्य बंद होणार आहे. रेशनकार्डच्या लाभार्थ्यांना शहरात 59 हजारांच्या उत्पन्नाची अट आहे. त्यामुळे दुचाकी किंवा कार असणारे लाभार्थी यांना श्रीमंत समजून सरकार त्यांचे रेशन कार्ड रद्द करू शकते.

सरकारच्या नव्या निर्णयानुसार रेशनकार्ड धारकांकडून माहिती लिहून घेतली जाणार आहे. घरी असलेली दुचाकी चारचाकी किंवा शेतीत वाढलेलं उत्पन्न याची माहिती गोळा करण्याचं काम प्रत्येक जिल्ह्यातील अन्न आणि पुरवठा विभागाकडून सुरू झालंय. 

तुमच्याकडे असलेल्या वाहनांची माहिती आरटीओकडून तपासली जाणार आहे. त्यामुळे खरी माहिती द्यावी लागेल. वाहने असलेल्या अनेक गरीब कुटुंबांना श्रीमंतीचा ठपका लावून शिधापत्रिका रद्द केली जाण्याची भिती आहे.

IMPIMP