सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात असहकार; नगरच्या इसळक ग्रामपंचायतीचा ठराव

अहमदनगर | मोदी सरकारने आणलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याला होणारा विरोध दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. आता नगरमधील एका ग्रामपंचायतीने देखील या कायद्याविरोधात ठराव केला आहे.

इसळक असं या ग्रामपंचायतीचं नाव आहे. २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत यासंदर्भात ठराव मांडण्यात आला होता. विशेष म्हणजे तो बहुमताने मान्य करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्यात नागरिकत्व सिद्ध करण्याची जबाबदारी संबंधित नागरिकावर आहे, मात्र आपल्या गावात अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास आणि दुर्बल घटकांचे प्रमाण जास्त आहे. अल्पशिक्षित समाज असल्याने यासंदर्भात पुरावे देणे आव्हानात्मक ठरणार आहे, असं या ठरावात म्हटलं आहे.

दरम्यान, सुधारित नागरिकत्व कायद्यात बदल व्हावा यासाठी या कायद्याविरोधात असहकार करण्यात यावा, असा ठराव मांडण्यात आला. ग्रामसभेत चर्चा करुन हा ठराव मंजूर करण्यात आला. इसळक गावच्या या ठरावाची आता चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गावात एकही मुस्लीम घर नसल्याचं सांगितलं जातंय.

Capc

महत्वाच्या बातम्या-

-” लोणीकर, तुमच्यासारख्या व्हिलनचा सुफडासाफ करायला वेळ लागणार नाही… जरा जपून बोला”

-2020चा अर्थसंकल्प हा साप शिडीचा खेळच- नवाब मलिक

-मोठे आकडे टाकून भुलभुलैय्या; छगन भुजबळांची अर्थसंकल्पावर सडकून टीका

-…अन् शर्विकाने केला अर्ध्या तासात कलावंतीणीचा सुळका सर

-“अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचं योगदान सर्वात जास्त आहे पण…”