पंजाबने राखला आम आदमीचा ‘मान’; झाडूकडून काँग्रेसचा सुपडा साफ

चंदीगड | देशात सर्वत्र पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालाची चर्चा आहे. सर्वत्र राजकीय जाणकार निकालाचं विश्लेषण करत आहेत.

सर्वांनाच धक्का देणारे कल पंजाबमधून येत आहेत. पंजाबमध्ये सत्ताधारी काॅंग्रेसला धक्का देण्यात आम आदमी पार्टीनं यश मिळवलं आहे.

काॅंग्रेसच्या दिग्गज नेत्यांना आपापले मतदारसंघ देखील सांभाळण्याय सध्या अपयश येत असल्याचं लक्षात येत आहे. परिणामी राजकीय जाणकार देखील अचंबीत झाले आहेत.

117 जागा असलेल्या पंजाबमध्ये आप सध्या 89 जागांवर आघाडीवर आहेत. आम आदमी पक्षानं विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली होती.

केजरीवाल यांच्या दिल्ली माॅडेलची चर्चा प्रचारादरम्यान होत होती. पंजाबमध्ये असलेली सर्वात मोठी नशाखोरीची समस्या मिटवण्याचं ठोस आश्वासन केजरीवाल यांनी दिलं होतं.

केजरीवाल यांनी आपचे खासदार भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केल्यानंतर वातावरण फिरलं होतं. याचा फायदा आता आम आदमी पक्षाला होताना दिसत आहे.

सत्ताधारी काॅंग्रेसला फक्त 12  जागांवर आघाडी मिळवता आल्यानं मोठी नामुष्की काॅंग्रेसवर ओढवली आहे. सध्या इतर कोणत्याही निकालापेक्षा आपच्या कामगिरीची चर्चा आहे.

दरम्यान, दिल्लीनंतर आता पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करणार आहे, असं आपचे नेते म्हणत आहेत. संपुर्ण निकालाची वाट न बघता आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘योगी पुढं जाणार हे नक्की होतं पण…’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 

 Election Results 2022 | शिवसेनेला मोठा धक्का! एकाही जागेवर उमेदवार आघाडीवर नाही

“आमचं राजकारण नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं” 

गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर; ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला 

निकालाच्या 12 तास अगोदर गोव्यात हालचालींना वेग; काँग्रेसचे दिग्गज नेेते गोव्यात दाखल