इंदापूरच्या राजकारणात मोठी खळबळ; राष्ट्रवादीचा हर्षवर्धन पाटलांना दे धक्का!

पुणे |  भाजप नेते सध्या महाविकास आघाडीला कात्रीत पकडण्याचं काम करत आहेत. पण इंदापूरमध्ये मात्र राष्ट्रवादीनं भाजपला कात्रीत पकडल्याचं पहायला मिळत आहे.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष अवघ्या राज्याला परिचयाचा आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यात मोठा राजकीय संघर्ष पहायला मिळतो.

भरणे यांच्यात आणि पाटील यांच्यात वारंवार शाब्दिक वाद रंगल्याचं पहायला मिळालं आहे. अशातच भरणे मामांनी पाटील यांना चांगलाच धक्का दिला आहे.

पाटील यांच्यासाठी अगदी घरासारखा असणारा जिल्हा परिषद गट लाखेवाडी-बावडाचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत  ढोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

एप्रिलच्या 3 तारखेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ढोले राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

शेतकरी मेळाव्यात ढोले सर आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रावादीत प्रवेश करणार असल्याचं भरणे यांनी स्पष्ट केलं आहे.

ढोले यांनी लाखेवाडी-बावडा जिल्हा परिषद गटातून 2012-2017 काळात सदस्य म्हणून काम पाहिलं आहे. त्यानंतर या गटातून हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील निवडणूक लढवली आहे.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या निकटवर्तीयांनाच राष्ट्रवादीत आणल्यानं पाटील यांच्यासाठी मोठी राजकीय हानी मानली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 दाद्या मारायलाय…! शंकरपाळ्यानंतर आता महाराष्ट्राला वेड लावणारं बारकाल्या पोरांचं भांडण व्हायरल

NCC उमेदवारांसाठी खुशखबर! पोलीस भरतीसाठी ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“कोण कोणासोबत झोपतो हे…”, सत्ताधाऱ्यांवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली

Health Tips For Summer: कडक उन्हाळ्यात ‘हे’ 7 पदार्थ नक्की खा… शरीराला आराम मिळेल

स्वप्नांच्या मागे धावणाऱ्या प्रदीपचं आनंद महिंद्रांनी केलं तोंडभरून कौतुक, म्हणाले…