मुंबई | गेल्या 14 वर्षांपासून सर्वांचं मनोरंजन करत असेलेल्या ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे.
दया बेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी 2017 पासून मालिकेपासून लांब आहे. यामुळे दयाबेन कधी परतणार? असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला होता. आता लवकरच दयाबेन परतणार आहे. नुकतंच याबाबतचा एक प्रोमो समोर आला आहे.
या प्रोमोत दयाबेन ही लवकरच गोकुलधाम सोसायटीमध्ये परत येत असल्याचं दिसत आहे. यात जेठालाल हा सुंदरलालसोबत फोनवर बोलत असल्याचं दिसत आहे.
सुंदरलालने दिलेली ही खूशखबर ऐकून जेठालाल आणि गडा कुटुंबातील सर्व सदस्य फार खूश असल्याचे दिसत आहे. पण दयाबेन हे पात्र कोण साकारणार? याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.
दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाची प्रचंड लोकप्रियता आहे. गेली 14 वर्षे ही मालिका लोकांचं मनोरंजन करत आहे.
मालिकेतील पात्र आणि ते पात्र साकरणारे हे कलाकार प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. गेल्या 14 वर्षांपासून या मालिकेने सर्वांना खूप हसवलंय. या मालिकेचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रेल्वेने भंगार विकून मिळवले ‘इतके’ कोटी; आकडा वाचून थक्क व्हाल
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, आता अरुण गवळीचं कनेक्शन समोर
Monsoon Update | येत्या 2 दिवसांत ‘या’ सहा जिल्ह्यांना पाऊस झोडपणार
महागाईने त्रस्त सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी!
“तुमची लायकी असेल तर एकदा मावळात येऊन उभे राहा म्हणजे…”