‘काम नसेल तर माझ्या शेतात मजुरीला ये मी तुला..’; पंजाबच्या आजींची कंगनाला जबरदस्त ऑफर!

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत अलीकडे सतत चर्चेत आहे. कंगना सोशल मीडियावर अनेक वादग्रस्त विधानं करत असते. कंगना काहीतरी बोलली आणि वाद झाला नाही, असं क्वचितंच घडलं असेल. कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिला भरपूर नुकसान देखील सहन करावं लागलं आहे.

पुन्हा एकदा कंगनाचं एक वक्तव्य तिच्या चांगलंच अंगलट आलं आहे. नुकतंच कंगनाने दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनात सामील झालेल्या एका वयोवृद्ध आजींवर कमेंट करत सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. काही वेळाने तिने ही पोस्ट डिलीट केली होती. मात्र, तिनं केलेल्या या वक्तव्यामुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

कंगनाने या आजींवर कमेंट करताना म्हटलं होतं की, दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनात सामील होणाऱ्या आजी शेतकरी आंदोलनात देखील सामील झाल्या आहेत. 100 रुपयांसाठी त्या आंदोलनात भाग घेतात. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिला ट्रोल करण्यात येवू लागल्यानंतर तिने ही पोस्ट डिलीट केली होती.

कंगनाने ज्या वयोवृद्ध आजींवर कमेंट केली होती त्या भटिंडाच्या जंडीया या गावातील आहेत. 87 बर्षीय या आजींचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या व्हिडिओमधून त्या आजी कंगनाला चांगलेच खडे बोल सुणावत तिला त्यांच्या शेतात कामाला येण्याची ऑफर देत आहेत.

या आजी व्हिडिओमध्ये सांगत आहेत की, माझ्यकडे 13 एकर जमीन आहे. मला 100 रुपयांसाठी कोठेही जायची गरज नाही. कंगना राणावतला कोरोनामुळे काम नसेल तर ती इतर मजुरांप्रमाने माझ्या शेतात काम करू शकते.

शेतकरी आंदोलनाच्या पार्रश्वभूमीवर बोलताना या आजी म्हटल्या की, मी आज देखील शेतात काम करते. मी शेतकऱ्यांच्या संघर्षात केव्हाच मागे राहिले नाही. मी शेतकरी आहे यामुळे माझ्या शेतकरी भावांसोबत मी या आंदोलनात आली होती.

या अभिनेत्रीला पंजाबचे लोक आणि शेतकरी यांच्याबद्दल समज नाही. तिला समज असती तर तिने असं वक्तव्य केलं नसतं. अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे डोक नसल्याचं लक्षण आहे, असंही या आजी म्हटल्या आहेत.

तसेच पुढे या आजी म्हटल्या की, ती सरकारच्या भक्तीत मनाला येईल ते बोलत आहे. तिला हे देखील समजत नाही की कोणाबद्दल काय बोलावं. जेव्हा तिचे मुंबईतील ऑफिस तोडले गेले होते तेव्हा तिला संपूर्ण पंजाबने साथ दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

सात दिवसात माफी माग नाहीतर…; कंगणा राणावत पुन्हा अडकली नव्या वादात

‘त्यावेळी सर्वकाही व्यवस्थित होतं पण…’; सुशांत प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी प्रथमच मौन सोडलं

Whatsapp वरील डिलीट केलेले मेसेज वाचायचे आहेत? मग ही भन्नाट ट्रिक वापरा

लेकीने करीनाला ‘आँटी’ म्हणताच संतापलेला सैफ साराला म्हणाला…

महिंद्रा कंपनी लवकरंच बंद करणार नुकतीच लॉंच केलेली ‘6 सीटर SUV थार’? वाचा सविस्तर