मुंबई | मंत्री नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. नवाब मलिकांनी केलेला अर्ज न्यायालयाने मान्य केलाय.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी नवाब मलिक सध्या ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
प्रकृती ठीक नसल्याने नवाब मलिक यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास नकार दिला आहे.
परिवारातील एका व्यक्तीला मलिकांसोबत उपचारादरम्यान उपस्थित राहण्यास न्यायालयाने मुभा दिली आहे. उपचांरासह पोलीस बंदोबस्ताचा खर्च नवाब मलिक यांनाच करावा लागणार आहे.
जामीन अर्जात नवाब मलिक यांना न्यायालयाला किडनीच्या आजारांमुळे प्रकृती ठीक नसून, पायांना सूज असल्याचं सांगितलं होतं. त्याच वेळी खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी परवानगी देण्याचीही मागणी केली होती.
दरम्यान, सत्र न्यायालयाने सदर मागणी पूर्ण केली असून, नवाब मलिकांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
‘लक्षात ठेवा त्याच कबरीमध्ये तुम्हाला जावं लागेल’; एमआयएमविरोधात शिवसेना आक्रमक
मोठी बातमी! पुणे रेल्वे स्थानकावर बाॅम्ब सदृश्य वस्तू
‘मनी लाॅंड्रिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी होणार’; भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
कोण होणार ‘IPL 2022’ चा बादशहा?, दोन संघ बाहेर पडताच आठ संघांमध्ये चुरस