Top news देश

सलाम त्याच्या कार्याला! डिलिव्हरी बाॅयनं भर पावसात पोहचवलं जेवण, होतोय कौतुकांचा वर्षाव

Photo Credit - dominos_india / Twitter

मुंबई| सोशल मीडियावर अनेक वेवेगळे फोटो, व्हिडीओ व्हायरल झालेले पहायला मिळत असतात. मात्र त्यातले काहीच फोटो, व्हिडिओ प्रेक्षकाच्या पसंतीस उतराताना दिसतात.

अशी अनेक लोकं असतात जी आपलं काम चुकवताना दिसतात. काहीतरी कारण सांगून काम टाळण्याचा प्रयत्न करत असतात. तोच दुसरीकडे प्रामाणिक लोकं पाहायला मिळतात जे आपलं काम कोणत्याही परिस्थितीत, अडि-अडचणींचा सामना करत पूर्ण करत असतात.

सध्या व्हायरल होणारा एक फोटो अशाच एका प्रामाणिक माणसाचा असून त्यानं आपलं कर्तव्य बजावल्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होतना दिसत आहे.

एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हायरल होणारा फोटो आहे एका डोमिनोजच्या डिलिव्हिरी बॉयचा. या फोटोत फूड डिलिव्हरीसाठी भरपावसात उभा असलेला डिलिव्हिरी बॉय दिसत आहे.

अनेकांनी डिलिव्हिरी बॉयच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला आहे. डोमिनोजने देखील मुसळधार पावसात काम करणाऱ्या आपल्या बॉयचं भरभरून कौतुक केलं आहे. डोमिनोजने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करून माहिती दिली आहे.

फोटोतून व्हायरल होणाऱ्या या डिलिव्हरी बॉयचं नाव शोवन घोष आहे. पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला. यामुळे कोलकातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर तसेच परिसरात भरपूर पाणी साचलं होतं. गुडघ्याभर पाण्यात डोमिनोजचा डिलिव्हरी बॉय शोवन फूड ऑर्डर दिलेल्या व्यक्तीची वाट पाहत होता.

डोमिनोजने शोवनच्या फोटो सोबतच “एक सैनिक कधीच आपल्या कर्तव्यापासून दूर जात नाही. आमच्याकडे ते निळ्या रंगात येतात आणि कोलकाताच्या पावसामध्ये गरमागरम ताजं आणि सुरक्षित अन्न लोकांना प्रदान करतात. आम्ही आमच्या #DominosFoodSoldier शोवन घोषच्या सेवेला सलाम करतो. ज्यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील पावसात अडकलेल्या आपल्या ग्राहकांला भोजन देण्याची तयार दाखवली आणि ते पोहोचवलं” असं म्हटलं आहे

डोमिनोजने 12 मे रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शोवनचा पाण्यात उभा असलेला फोटो ट्विट करून कौतुक केलं आहे. यानंतर अनेकांनी ते ट्विट रिट्विट केलं असून त्याच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

चक्क फॉर्च्युनर गाडीमधून विकत होता वांगी; पाहा व्हायरल…

75 वर्षाच्या आजीनं लग्नात केला खतरनाक डान्स, पाहा व्हायरल…

सलमानच्या ‘सीटी मार’ या गाण्यावर डाॅक्टरांनी केला भन्नाट…

कोरोना होऊनही रुग्णालयातील फरशी साफ करताना दिसले…

हेअरकट आवडला नाही म्हणून 10 वर्षाच्या मुलानं लावला पोलिसांना…

IMPIMP