भाजप प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. या यादीत राष्ट्रवादीला 12, शिवसेनेला 13 आणि काँग्रेसला 11 जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आलंआहे. यामध्ये भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे नेते हसन मुश्रीफ यांना अहमदनगरचे पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोल्हापूरचं पालकमंत्रिपद देण्यात आलं होतं. आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी थोरात यांना संधी दिली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या या यादीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांना एकाही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाही. तर रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांचीही कोणत्याच जिल्ह्यातील पालकमंत्रिपद मिळालेलं नाही.

महत्वाच्या बातम्या-