ऑनलाईन अभ्यासामुळे मुलांच्या डोळ्यांवर परिणाम, गुजरात हायकोर्टाचा सरकारला हा सवाल

गुजरात| कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये ऑनलाईन शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र ऑनलाईन अभ्यासामुळे शाळकरी मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. त्यामुळे याबाबत कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत गुजरात हायकोर्टाने राज्य सरकारला आदेश दिले आहेत.

कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता अनेक राज्यांमध्ये अनलॉक करण्यास सुरुवात केली आहे. मात्र तरीही अनलॉक १ मध्ये शाळा सुरु करण्यास परवानगी नसल्याने ऑनलाईन शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.

शाळा सुरु करण्यात आल्या नसल्या तरीही काही खाजगी शाळा ऑनलाईन शाळा सुरु करून पालकांकडून फी घेत आहेत. याच कारणाविरोधात गुजरात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर गुजरात हायकोर्टाने मुलांच्या ऑनलाईन अभ्यासाबाबत सरकारडून उत्तरं मागितली आहेत.

गुजरात हायकोर्टाच्या म्हणण्यानुसार, शाळांच्या फीसंदर्भातील अधिकार हे राज्य सरकारकडे आहेत. त्यामुळे फीसंदर्भातील निर्णय सरकारने घ्यावा. यासाठी सरकारने शाळेच्या संचालकांसोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला पहिजे असंही कोर्टाने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भंगार गोळा करणाऱ्या बापाचा लेक झाला नायब तहसीलदार, बापाचे आनंदाश्रू थांबेना…!

-बाबा, तुम्ही सोबत असल्यावर माझ्या अंगात हत्तीचं बळ येतं; खडसेंच्या लेकीची भावूक पोस्ट

-नरेंद्र मोदी हे खरं तर ‘सरेंडर’ मोदी आहेत- राहुल गांधी

-बारामतीत रेशनिंगच्या मालाची खुल्या बाजारात विक्री; छाप्यात ‘इतक्या’ लाखांचा माल जप्त

-चिंताजनक! पुणे जिल्ह्यात एकाच दिवसात आढळले कोरोनाचे 823 रुग्ण