…म्हणून अजूनही या राज्यांमध्ये नवे वाहतूक नियम लागू नाहीत!

मुंबई | 1 सप्टेंबरपासून संपूर्ण देशात नव्या वाहतूक नियमांची अंमलबजावणी झाली आहे. यानुसार, वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून 10 पट अधिक दंड आकारला जाईल. मात्र असं असलं तरी मध्यप्रदेश, राजस्थान गुजरात, पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अद्यापही हे नियम लागू करण्यात आलेले नाहीत.

वाढलेल्या दंडामुळे या राज्यांनी या नियमांची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरटीओशी चर्चा करुन हे नवे नियम लागू करण्यावर निर्णय घेण्यात येईल, असं गुजरात सरकारने सांगितलं. 

राजस्थान सरकारने सोमवारी (2 सप्टेंबर) याबाबतचा आढावा घेण्यात येईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असं सांगितलं. या नियमांचा अभ्यास करुन राज्यात नवे दंड लागू होतील, असं मध्यप्रदेश सरकारने स्पष्ट केलं आहे.

पंजाबच्या अमरिंदर सिंग यांच्या सरकारनेही राज्यात हे नवे नियम लागू केलेले नाहीत. ट्र‌ॅफीक पोलिसांना याबाबत कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिळालेलं नाही. पश्चिम बंगालच्या सरकारने आधिच हे नवे नियम लागू करण्यास नकार दिला होता.

वाहतूक नियमांना अधिक कठोर केल्याने लोकांमध्ये याबाबत गांभीर्य वाढेल, लोक नियमांचं टाकेकोरपणे पालन करतील, त्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-