“आडनाव ठाकरे नसतं, तर ते संगीतकारांमध्ये दिसले असते”

नाशिक |  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आडनाव ठाकरे नसतं, तर ते संगीतकारांमध्ये दिसले असते, अशी बोचरी टीका शिवसेना नेते आणि ठाकरे मंत्रिमंडळातील नवनिर्वाचित पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. नाशिकमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी ते बोलत होते.

मनसे हा पक्ष नसून गद्दार आहे. बाळासाहेबांशी गद्दारी करणारे संपले. तुम्हाला जी थोडीफार किंमत मिळत आहे ती केवळ ठाकरे आडनाव असल्यामुळेच मिळत असल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

भाजपने आजपर्यंत मुस्लिम बांधवांचा फक्त वापर केला आहे. आमच्या पोराला तुम्ही काळे बोलणार आणि स्वत:च्या मुलाला गोरं बोलणार, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

दरम्यान, भाजप भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र महाविकास आघाडीचे सरकार टिकणार असल्याचा विश्वासही पाटलांनी व्यक्त केला. गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शहरात पहिल्यांदाच सभा घेतली. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केलं.

महत्वाच्या बातम्या-