मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकींमध्ये 300 जागा जिंकेल, असं आपल्याला वाटत नसल्याचं आझाद यांनी म्हटलंय. ते कृष्णा खोऱ्यातील पुंछ जिल्ह्यातील एका सभेत बोलत होते.
सध्या आझाद हे पुंछ आणि राजौरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कलम 370 संदर्भात बोलणं हे अयोग्य ठरेल असंही काही दिवसांपूर्वी आझाद म्हणाले होते. पूर्ण राज्याचा दर्जा देणे आणि लवकर विधानसभा निवडणूक घेणं या आपल्या दोन प्रमुख मागण्या आहेत, असं आझाद यांनी म्हटलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय.
आपल्याकडे 300 खासदार कधी असणार? त्यामुळे मी तुम्हाला आश्वास देऊ शकत नाही कारण काहीही झालं तरी त्यासाठी 2024 मध्ये 300 खासदार निवडून येणं गरजेचं आहे, असं आझाद म्हणाले.
देव करो आणि आपले 300 निवडून येवोत. पण सध्याची परिस्थिती पाहता हे होईल असं वाटतं नाही. त्यामुळेच मी तुम्हाला खोटी आश्वासनं देत नाहीय आणि कलम 379 वर बोलणं टाळतोय, असं आझाद यांनी म्हटलंय.
मागील तीन वर्षांपासून आपणच संसदेमध्ये कलम 370 संदर्भातील निर्णयाला विरोध करत असल्याचं आझाद यांनी स्पष्ट केलं आहे.
सरकारला बदल करण्याचा अधिकार असला तरी तो बदल जम्मू-काश्मीर विधानसभेच्या माध्यमातून व्हायला हवा होता संसदेमधून नाही, असंही आझाद यांनी म्हटलंय.
दरम्यान, गुलाब नबी आझाद यांनी केलेल्या वक्तव्यावरून ओमर अब्दुल्ला यांनी टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण हाती घेण्याआधीच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पराभव स्वीकारलाय, असं अब्दुल्ला म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रचंड मेहनत करुनही करिअरमध्ये यश मिळत नाहीये?, मग करा हे उपाय
ओमिक्रॉनचा प्रसार आणखी वाढणार?; WHO ने दिलेल्या माहितीने जगाचं टेंशन वाढलं
चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी
ATMमधून पैसे काढताय! मग जाणून घ्या ‘ही’ नवीन नियमावली
मोठी बातमी! उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात