हिंदुत्वाची तुलना ISIS शी करणं चुकीचं- गुलाम नबी आझाद

नवी दिल्ली | माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या सनराइज ओव्हर अयोध्या: द नेशनहूड इन अवर टाईम्स या पुस्तकात हिंदुत्वाबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यावरून सध्या नवा वाद सुरू झाला आहे. आता या प्रकरणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हिंदुत्वाची तुलना ISIS शी केली जाऊ शकते, हे चुकीचं आहे आणि अतिशयोक्ती असल्याचे, गुलाम नबी आझाद यांनी म्हटले. खुर्शीद यांच्या नवीन पुस्तकात हिंदुत्वाबद्दल जी मतं मांडली आहेत, त्याच्यावरून सध्या देशात वाद सुरू आहे.

हिंदू धर्माच्या मिश्र संस्कृतीपासून वेगळे असलेली राजकीय विचारधारा म्हणून हिंदुत्वाशी आम्ही असहमत असलो, तरी ISIS आणि जिहादी इस्लामशी हिंदुत्वाची तुलना करणे हे वास्तवात चुकीचे आणि अतिशयोक्ती आहे, असं त्यांनी म्हटलंय. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

आझाद हे काँग्रेसच्या ‘G23’ गटाचे प्रमुख नेते आहेत. सलमान खुर्शीद यांनी अनेक प्रसंगी उघडपणे या गटावर टीका केली असून त्यांना गांधी घराण्याचे विश्वस्त मानले जाते.

हिंदू धर्म हा अत्यंत उच्च दर्जाचा धर्म आहे. यासाठी गांधीजींनी जी प्रेरणा दिली, त्याहून मोठी प्रेरणा दुसरी असूच शकत नाही. मी नवीन लेबल का स्वीकारू? कोणी हिंदू धर्माचा अपमान केला तरी मी बोलेन. मी म्हणालो, की जे हिंदुत्वाचे राजकारण करतात ते चुकीचे आहेत आणि ISIS देखील चुकीचं आहे, असं सलमान खुर्शीद यांनी सांगितलं आहे.

राजधानी दिल्लीतील एका वकिलाने खुर्शीद यांच्याविरोधात दिल्ली पोलिसात तक्रार नोंदवली आहे. या पुस्तकात लिहिलं आहे की, ऋषी आणि संतांना ज्ञात असलेला सनातन धर्म आणि शुद्ध हिंदू धर्म (क्लासिकल हिन्दुइज्म) हे हिंदुत्वाचे असंस्कृत स्वरूप आहे.

हे सर्व पॅरामीटर्स, ISIS आणि बोको हराम सारख्या गटांद्वारे अलीकडील वर्षांच्या जिहादी इस्लामची राजकीय आवृत्ती आहे. या पुस्तकामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

दरम्यान, या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने काँग्रेस नेते दिग्विजय यांनी भाजपच्या विचारसरणीवरही कठोर भूमिका घेतली, हल्ला चढवला आणि भाजप देशात द्वेष निर्माण करणारा पक्ष असल्याचे वर्णन केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 “अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचं कौतुक करतात”

ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय! पाकिस्तानला धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश 

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; वर्षा गायकवाड यांनी केली ‘ही’ घोषणा

कोरोनाचा पुन्हा हाहाकार! ‘या’ देशात पाचव्या लाटेच्या उद्रेकाने भीतीचं वातावरण

“कंगनाचा वरचा मजला रिकामा, तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा”