औरंगाबाद महाराष्ट्र

मनसेवाल्यांनो, आमचं उष्ट कशाला खाताय?- गुलाबराव पाटील

औरंगाबाद | हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे आता औरंगाबदचं नाव संभाजीनगर करू पाहत असेल तर हा मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा लावून धरला होता. तेव्हापासून प्रत्येक शिवसैनिक औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर म्हणूनच करतो. त्यामुळे आमचं उष्ट कोणी खाऊ नये, अशी टीका शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मनसेवर केली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी औरंगाबादमध्ये लावलेल्या बॅनरवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला आहे. यावरून गुलाबराव पाटील यांनी मनसेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

मंत्र्याच्या बंगल्यावर दुरूस्तीसाठी मोठा खर्च केला जात आहे. या विषयावर विरोधक सरकारला घेरत असल्याचं पहायला मिळत आहे. या विषयावर गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलंय. दुरूस्तीचे प्रस्ताव काही मंत्री बनवत नाही ते वेगवेगळ्या एजन्सीज ठरवतात. त्या एजन्सीच्या पाहणीनुसार दुरूस्तीची गरज असेल तर ती दुरूस्ती केली जाते, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मंत्र्यांच्या बंगल्यावर येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्यांच्या सोयीच्या दृष्टीने गरज असेल तर दुरूस्ती केली जाते, असं गुलाबराव पाटलांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-“सावरकरांनी देशाची अतूट सेवा केली अन् काँग्रेस त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करतंय”

-क्षणिक आणि आभासी सुखाच्या मागे धावू नका; राजू शेट्टींचा शेतकरी मुलींना सल्ला

-पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय म्हणजे सरकारचा मुर्खपणा; काँग्रेस नेत्याचं टीकास्त्र

-आमचे पूर्वज हिंदूच होते मग आम्ही नागरिकत्वाचा दाखला का द्यावा?; सय्यदभाईंचा सरकारला सवाल

-पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय म्हणजे सरकारचा मुर्खपणा; काँग्रेस नेत्याचं टीकास्त्र