“माझ्या नादी लागू नका मी नारायण राणे सारख्या नेत्याला खपवतो, हे तर चिल्लर आहेत”

जळगाव | मागेच मी सांगितलंय की त्यांनी माझ्या नादी लागू नये, नारायण राणे सारख्या नेत्याला मी खपवतो. हे तर चिल्लर आहेत, अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप खासदार उन्मेष पाटलांचा समाचार घेतला आहे. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

गिरणा परिक्रमेच्या सुरुवातीलाच उन्मेष पाटलांनी एका पत्रकार परिषदे वाळू चोरीच्या मुद्द्यावर बोलताना गुलाबराव पाटलांना लक्ष्य केलं होतं. कुंपणच शेत खात असल्याची टीका त्यांनी केली होती. जिल्ह्यात सुरू असलेल्या वाळू चोरील पालकमंत्र्यांचं एकप्रकारे अभय असल्याचा हा अप्रत्यक्षपणे पालकमंत्र्यांना टोला होता.

पालक या शब्दाचा अर्थ समजून घेतला असता तर या बाबी समोर आल्या असत्या. कुंपणच शेत खात असेल तर व्यथा कुणाकडे मांडायाच्या अशी भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन या बाबतीत लोकांमधून आवाज उठवता येईल. पालकमंत्र्यांना 12 महिने झाले आहेत तरी बैठक घ्यायला वेळ नाही, असं उन्मेष पाटलांनी म्हटलं होतं.

उन्मेष पाटील यांनी केलेल्या टीकेला आता गुलाबराव पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. गुलाबराव पाटील यांनी उन्मेष पाटलांचा समाचार घेतला आहे. वाळू उपशाचा प्रश्न आताचं निर्माण झालेला नाही. वाळू चेतन माफियामध्ये शर्मा कोणत्या पक्षाचे होते हे खासदारांनी पाहावं, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.

वाळू माफियामध्ये सर्व जातीचे, सर्व धर्माचे आणि सर्व पक्षाचे लोक होते. पण, खासदारांना गुलाबराव पाटील नावाचा रोग झालेला आहे. परिक्रमा करायची असेल तर नदीच्या काठावरुन फिरायला लागतं, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

उन्मेष पाटलांनी केलेल्या टीकेला आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही आपल्या खास शैलीत उत्तर दिलंय. आपल्याकडून काहीच होत नाही. त्यांना जिल्ह्यात कुणी विचारत नाही, म्हणून गुलाबराव पाटील नावाचा जप करताय, असं म्हणत त्यांनी उन्मेष पाटलांना सुनावलं आहे.

मागेच मी सांगितलंय की त्यांनी माझ्या नादी लागू नये, नारायण राणे सारख्या नेत्याला मी खपवतो. हे तर चिल्लर आहेत, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी उन्मेष पाटलांचा समाचार घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

‘लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 80 टक्के लोकांना..’; पुणेकरांची झोप उडवणारी बातमी समोर 

पोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजना; गुंतवणूक केल्यास करात मिळेल सवलत 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; भरघोस पगारवाढ होण्याची शक्यता 

 बापरे! कोरोनाचा कहर सुरूच, गेल्या 24 तासातील धक्कादायक आकडेवारी समोर

 मेट्रोबाबत एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, म्हणाले…