‘नारायण राणेंचे जेव्हा आम्ही पाठीराखे होतो तेव्हा त्यांचे पोट्टे बनियनवर होते’; गुलाबरावांचं राणेपुत्रांना सणसणीत प्रत्युत्तर

मुंबई | राणे कुटुंबिय आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाकयुद्ध काही थांबण्याचं नाव नाही घेते. गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप खासदार नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत, अशा शब्दात टीका केली होती. त्यांच्या या टीकेला नितेश राणे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा गुलाबरावांनी राणेंनी केलेल्या टीकेला सणसणीत उत्तर दिलं आहे.

नारायण राणे जेव्हा शिवसेनेत होते, तेव्हा आम्ही त्यांचे पाठीराखे होतो. त्यावेळी त्यांचे पोट्टे बनियनवर होते. त्यामुळे त्यांनी मला शिकवू नये, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.  शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचं दुखद निधन झालं आहे. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी गुलाबराव पाटील अहमदनगरला आले होते. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आमदार नितेश राणे यांच्या वडिलांमागे आम्ही उभे होतो, तेव्हा नारायण राणे फायटर बटालियनमध्ये माझं नाव घ्यायचे. आता नारायण राणेंना मी वाईट कसा वाटायला लागलो. मी छत्तीस वर्षांपासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला धमक्या देऊ नये. मी निष्ठावंत आहे. गद्दारांच्या यादीत माझं नाव नाही, असं म्हणत गुलाबरावांनी राणेंना चिमटा काढला.

नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत, अशी टीका गुलाबरावांनी केली होती. यावर प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील कुणावर बोलतात?, नारायण राणे यांची उंची किती? ते शुद्धीवर किती तास असतात?, असं टीकास्त्र नितेश राणेंनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

भाजपचा ‘हा’ बडा नेता शरद पवारांच्या भेटीला; सुप्रिया सुळेंनी फोटो केला शेअर!

शेवग्याची पानं ‘या’ रुग्णांसाठी ठरू शकतात संजीवनी; वाचा सविस्तर!

सुशांतच्या शरीरावरील ते पांढरे डाग नेमके कशाचे?; फॉरेन्सिक रिपोर्टने केला उलगडा

‘ए मौत तूने मुझें जमींदार कर दिया’; प्रसिद्ध गझलकार राहत इंदौरी याचं निधन

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे