“नारायण राणे शिवसेनेमुळे मोठे झाले अणि शिवसेनेमुळेच रस्त्यावरही आले”

जळगाव | नारायण राणे यांचं शिवसेनेशी जुनं नातं आहे. ते सेनेमुळेच मोठे झाले आणि सेनेमुळेच रस्त्यावरही आले. त्यामुळे त्यांचं नातं प्रेमाचं पण आहे, असा चिमटा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंना काढला आहे.

कोरोना या संसर्गजन्य आजाराने देशावर मोठी आपत्ती निर्माण केली आहे. या परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे. राष्ट्रपती लागवट लागू करायची असेल गुजरात, दिल्ली व उत्तर प्रदेशातही करावी लागेल. मात्र या काळातही काही जण राजकारण करत असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरल्याने राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्याची मागणी केली होती. त्यावर गुलाबराव पाटील यांनी ही राजकारण करण्याची वेळ नसून आपत्तीच्या काळात एकत्र येण्याची वेळ असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

कोरोना हा काही महाराष्ट्राने आणलेला नाही. सर्वत्र जगात व देशात हा संसर्ग पसरला आहे. ही आपत्ती आहे, त्याला सामोरे गेले पाहिजे. काही त्रुटी असतील तर त्याला सामोरं गेलं पाहिजे, असं गुलाबराव पाटलांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादवांचा पियुष गोयलांना टोला, म्हणाले…

-भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहेत- पृथ्वीराज चव्हाण

-महाविकास आघाडी सरकार सध्या स्थिर आहे पण….- सुधीर मुनगंटीवार