मुंबई | महाविकास आघाडीमधील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.
उद्धव ठाकरे हे जर पंतप्रधान झाले तर आपण मुख्यमंत्री होऊ शकतो, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या पाळधी या गावात सभा पार पडली. या सभेत मनोगत व्यक्त करतांना मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.
हा गुलाबराव पाटील मंत्री होतो का नाही ते शक्यच नव्हते जनतेच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळे ते होऊ शकलं. आता आमदार किशोर पाटील म्हणाले की, मला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळावी, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते पंतप्रधान झालं तर मला मुख्यमंत्री होता येईल, असं यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं.
गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने केलेल्या भाषणात मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवल्यानं चर्चा सुरु झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘लाथ घातल्यानंतर…; शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची पुन्हा जीभ घसरली!
“कोरोना काळात जे ऑनलाईन पास झाले, त्यांना नोकरी मिळणार नाही”
शाळा पुन्हा बंद होणार का?; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्त्वाची माहिती
“घराचा पत्ता लोक कल्याण मार्ग ठेवल्याने लोकांचं कल्याण होत नाही”
केकेच्या निधनानंतर गायिकेचा धक्कादायक खुलासा!