‘…अन् पवारांची जादू चालली’, गुलाबराव पाटलांनी सांगितला पहाटेच्या शपथविधीचा किस्सा!

जळगाव | राज्यात 2019 विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय चित्र पुर्णपणे पालटलं. भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार येणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. मात्र, मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजप यांची काडीमोड झाली अन् राज्यात शिवसेना, राष्ट्रावादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन झालं.

राज्यभरात आजही राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा होत असते. त्यातच आता शिवसेना नेते तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीची आठवण सांगितली आहे.

जळगावमधील कार्यक्रमाला राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि एकनाथ खडसे उपस्थित होते. आयुष्यभर आम्ही ज्या पक्षावर टीका करत राहिलो, त्या पक्षाने काय जादू चालवली आम्हाला समजेना.

आता सकाळची शपथ नाही समजली तर दुपारची काय समजणार?, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे.

ही जादू काय आहे?, काही माणसांचे डोकं जादूगारासारखं कसं चालतं हे कळत नाही. मी तर भारावून गेलो होतो. त्यावेळेस रात्री बारा वाजता नाव जाहीर झाले आणि आम्ही सेलिब्रेट करत होतो.

सकाळी पाहिलं तर लोक सांगायचे की, ते संग्रहीत चित्र असेल. ते संग्रहीत चित्र नव्हतं ते थेट चित्र होतं. मात्र, शरद पवारांची जादू पुन्हा चालली. सुबह का भूला शाम को वापस आये तो उसे भूला नहीं कहते, अशी शेरेबाजी गुलाबराव पाटलांनी केली.

सगळे परत यायला लागले. या रे माझ्या बाळांनो. परत या आपल्या घरट्याला. योगायोगााने आपलं सरकार तयार झालं. 1982 साली पानटपरी चालवायचो आज बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने आपल्यासमोर मंत्री म्हणून आलो, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

आरामदायी Marutiची नवी 7 सीटर कार लाॅन्च; किंमत पण फारच कमी…

रणबीर-आलियाचं लग्न तर झालं पण शेजाऱ्यांनी घोळ घातला, प्रकरण पोलिसात गेलं अन्…

राज ठाकरेंच्या भाषणानंतर शरद पवारांना सतावते ‘ही’ चिंता, म्हणाले…

गुलाबराव पाटलांनी राज ठाकरेंना सुनावलं, म्हणाले “शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही…”

“एकेकाळी माझे पाय धरायचे, ते आता माझ्याविरोधात आणि पवारांवर बोलतात