मुंबई | राज्यभर सुरू असलेल्या एस. टी. आंदोलनाच्या नेतृत्वात फूट पडल्याचे अखेर गुरुवारी स्पष्ट झालं आहे. मुंबईतल्या आझाद मैदानातून आंदोलनातून काढता पाय घेत असल्याची घोषणा सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी केल्यानंतर तात्काळ काही मिनिटांध्ये अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला.
दोघांनाही आंदोलनातून आझाद केलं आहे. आता विलीनीकरणासाठी आंदोलन डंके की चोट पे असल्याचा इशाराही गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.
आपण संघटनेतील कामगारांचे पैसे गोळा केले, त्यातून 3 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप तुमच्यावर होत असल्यासंदर्भात वकील गुणरत्न सदावर्तेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना सदावर्ते यांनी आमदार पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार प्रहार केला.
‘मी एक रुपयाही कोणाकडून घेतला नाही, मी संघटना म्हणून नाही. सदाभाऊ तुम्ही पाया पडलेले व्हिडिओ माझ्याकडे आहेत, ती रेकॉर्डींग जर मी सांगितली. तुम्ही म्हणालात, दोन लेकरांची शपथ घेतो, असं सदावर्ते म्हणाले.
सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकर तुम्ही माझ्या घरी दोनदा आला होता. विश्वास नांगरे पाटलांची भीती वाटत होती म्हणून आलात. हे पराभूत मानसिकतेतून काहीही बोललं जात आहे, असं सदावर्तेंनी सांगितलं.
एस. टी. कामगारांची ही लोकचळवळ आहे. हा खोत-पडळकर यांनी एकट्यांनी पुकारलेला लढा नाही, असं म्हणत त्यांनी खोत अन् पडळकरांवर निशाणा साधला आहे.
कामगार नेते दत्ता सामंत यांच्या हत्येनंतर 70 वर्षांनी ही अभूतपूर्व लोकचळवळ सुरू आहे. सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी स्वतःसाठी या आंदोलनाला स्थगिती दिली, असं ते म्हणालेत.
आम्ही विलीनीकरणासाठी डंके की चोट पे, हे आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी कर्मचाऱ्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, आमची भूमिक वेगळी आहे. आंदोलन पुढं कसं न्यायचं, त्याची रणनीती सारं काही वेगळं असतं म्हणत तलवार म्यान करण्याचे संकेत दिले. त्यानंतर तात्काळ या आंदोलनाचं नेतृत्व आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! नवाब मलिकांना मुंबई उच्च न्यायालयाचा जोरदार झटका
गुणरत्न सदावर्तेंची शरद पवारांवर बोचरी टीका, म्हणाले…
“महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांबद्दल एकेरी उल्लेख करता तुमचं कर्तृत्व काय”
‘या’ महिन्यात कोरोनाची तिसरी येण्याची दाट शक्यता- राजेश टोपे
एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ; अनिल परबांची मोठी घोषणा