महाराष्ट्र Top news मुंबई

गुणरत्न सदावर्तेंची शरद पवारांवर बोचरी टीका, म्हणाले…

Gunratn sadavarte and Sharad Pawar

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून अ‌ॅड गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. पवारांचे कलरफुल राजकारण आहे. त्यांनी संपकऱ्यांना तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कालच्या परीक्षेत नापास झाले आहेत, असं गुणरत्न सदावर्ते म्हणालेत.

नऊ जणांच्या शिष्टमंडळाने राज्य सरकारसमोर केवळ विलीनीकरणाची मागणी केली होती. मात्र मंत्री कालच्या बैठकीत खोटे बोलले, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

पत्रकार परिषदेत दोन आमदार गेले आणि आम्ही कामगारांचे नेते म्हणून भूमिका मांडत आहोत म्हणाले. काल कामगार शिष्टमंडळ गेलं. त्यांना आत कोंडून ठेवलं गेलं. बाहेर येऊ दिलं नाही, असं सदावर्तेंनी सांगिंतलं.

शिष्टमंडळ बाहेर येऊन सत्य सांगतील म्हणून त्यांना पोलिसांच्या बंदोबस्तात बाहेर काढलं, असा आरोप सदावर्ते यांनी सरकारवर केली आहे.

अनिल परबांचा आम्ही राजीनामा मागत आहोत. त्यांना तत्काळ बडतर्फ करा. अन्यथा त्यांची तक्रार राज्यपालांकडे करू, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारला दिला आहे.

दरम्यान, सदावर्ते यांनी शिवसेनेचे खासदार आणि पत्रकार संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांनी एकदाही त्यांच्या ‘रोखठोक’ मधून कष्टकरी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेतली नाही. हे लज्जास्पद आहे, अशी टीका सदावर्तेंनी राऊतांवर केलीये.

संजय राऊत हे माझे मित्र आहेत. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत. इथे घडलेले विद्यार्थी कायम तठस्थतेची भूमिका घेतात. मात्र संजय राऊत यांची सध्याची भूमिका लज्जास्पद असल्याची टीका अ‍ॅड. सदावर्ते यांनी केली आहे.

दरम्यान, विलिनीकरणाची मागणीमान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असं सदावर्तेंनी सांगितलं.

खोत आणि पडळकर यांनी माघार घेतली असली तरीही हा लढा थांबणार नाही, असं गुणरत्न सदावर्तेंनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांबद्दल एकेरी उल्लेख करता तुमचं कर्तृत्व काय” 

‘या’ महिन्यात कोरोनाची तिसरी येण्याची दाट शक्यता- राजेश टोपे 

एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ; अनिल परबांची मोठी घोषणा 

एकनाथ शिंदे की अजित पवार?, महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कुणाकडे जाणार??? 

नाना पटोलेंचा महाविकास आघाडीला झटका, केली ‘ही’ मोठी घोषणा