“दादागिरी केली असती तर 35 वर्षे राजकारणात टिकलो नसतो”

मुंबई | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील राजकीय वातावरण बदलत असल्याचं पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बिघाडी झाल्याचं पहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस आमदारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेचे दोन मंत्री माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत, असा आरोप टोपेंनी केला आहे.

राजेश टोपेंनी शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यानंतर आता टोपेंच्या या आरोपावर शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे यांनी आरोप केले आहेत.

आपण दादागिरी केली असती तर राजकारणात 35 वर्ष टिकलोच नसतो. राजेश टोपे यांचे सगळे आरोप खोटे आहेत, असं संदिपान भुमरे यांनी म्हटले आहेत.

सत्तार आणि भुमरे यांनी आघाडी धर्म पाळावा, असा सल्लाही टोपेंनी दिला आहे. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान, आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात युतीची शक्यता वर्तविली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

शिवसेना आमदाराच्या पत्नीच्या आमहत्येचं गूढ वाढलं, त्या शेवटच्या मेसेजने खळबळ

स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचं निधन!

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ 

“देशातील चित्र बदलेल, इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता हे विसरू नका” 

…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी