लाहोर | 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. अटक करून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
मुंबईवर 26/11 ला हल्ला झाला होता त्यात हाफिज सईदची महत्वाची भूमिका होती. त्याचे पुरावे देखील भारताने पाकिस्तानला दिले होते.
मागिल काही दिवसांपासून भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानवर सातत्याने दबाव आणला होता. याच दबावामुळे हाफिजला आज अटक करण्यात आलं आहे.
लाहोरवरून तो गुजरांवालाकडे जात होता. त्याचवेळी त्याला ही अटक झाली आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी याबाबतचं वृत्त दिलं आहे.
दरम्यान, भारताच्या दृष्टीने आजची ही सगळ्यात मोठी बातमी आहे. भारताच्या कूटनीतीचा हा मोठा विजय मानण्यात येत आहे.