महाराष्ट्र मुंबई

शिवसेनेला मोठा धक्का; उपनेते हाजी अरफात शेख यांचा भाजपमध्ये प्रवेश!

शिवसेनेचे उपनेते हाजी अरफात शेख यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. महामंडळ नियुक्त्यांमध्ये त्यांची नुकतीच राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती भाजपकडून होती अशी माहिती आता समोर येत आहे.

उद्धव ठाकरेंकडे केली होती लॉबिंग-

हाजी अरफात शेख सध्या शिवसेनेच्या वाहतूक संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. त्यांना आयोगाचं उपाध्यक्षपद हवं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून या पदासाठी ते उद्धव ठाकरेंकडे लॉबिंग करत होते, अशी माहिती आहे.

भाजपकडून शिवसेनेला मोठा धक्का-

शिवसेना उपनेते हाजी अरफात शेख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यानं यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं खेळलेली ही चाल शिवसेनेसाठी धक्का देणारी आहे, मात्र यामुळे आगामी काळात सेना-भाजपमधील कुरघोडी आणखी रंगण्याची शक्यता आहे. भाजप शिवसेनेला आणखी मोठा धक्का देऊ शकतो, अशीही चर्चा आहे. 

IMPIMP