‘हल्दीराम’च्या मालकाचं निधन; कुटुंब अडकलं परदेशात

मुंबई | शेवचं छोटंस दुकान ते हल्दीराम भुजियावाला (प्रतीक फूड प्रॉडक्ट्स) असा यशस्वी प्रवास करणारे हल्दीराम भुजियावालाचे मालक महेश अग्रवाल यांचे शुक्रवारी मध्यरात्री सिंगापूरमध्ये निधन झालं आहे.

गेले तीन महिने सिंगापूरमधील रूग्णायलात त्यांच्यावर उपचार सुरू होते. यकृताच्या गंभीर आजारामुळे ते त्रस्त होते. शनिवारी अग्रवाल वयाच्या 57 व्या वर्षात पदार्पण करणार होते. मात्र आदल्या दिवशी त्यांचे निधन झालं.

सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे त्यांचे कुटुंबीय हे सिंगापूरमध्येच अडकले असून अग्रवाल यांच्यावर पार्थिवावर सिंगापूरमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. अग्रवाल यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन मुली असा त्यांचा परिवार आहे.

सिंगापूरमध्ये त्यांना हिंदू रितीनुसार अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे सिंगापूरच्या नियमांनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महेश अग्रवाल यांचे निधन झाले तेव्हा त्यांची पत्नी मीना आणि मुलगी अवनी त्यांच्यासोबत सिंगापूरमध्ये होते.

महत्वाच्या बातम्या-

-ही लढाई दीर्घकाळ चालेल, पण आपल्याला थांबायचं नाही- नरेंद्र मोदी

-तेव्हा विचारलं ‘गो कोरोना’ म्हणून जाईल का? अन् आता सगळेच म्हणतात गो कोरोना- रामदास आठवले

-मरकज प्रकरणावरून शरद पवार यांची नाव न घेता अमित शहांवर टीका

-फुले जयंतीला ज्ञानाचा तर बाबासाहेबांच्या जयंतीला संविधानाचा दिवा लावा- शरद पवार

-पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा शरद पवारांना फोन; तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा