नवी दिल्ली | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने देशात खळबळ माजली आहे. दक्षिण अफ्रिकेसह 12 देशांमध्ये कोरोनाचा हा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे (Karnataka Omicron Cases) दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह (Maharashtra on alert) देश अलर्टवर आहे.
संपूर्ण देशाला काळजीत टाकणारे अहवाल पुन्हा प्राप्त झालेत. जे दोन ओमिक्रॉन पेशंट आहेत त्यातल्या एकाच्या संपर्कातले 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचंही टेन्शन वाढलं आहे. कारण कर्नाटक हा महाराष्ट्राच्या शेजारी आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटकात आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. विशेष म्हणजे बंगळुरूमध्ये जे दोन ओमिक्रॉनची लागण झालेले पेशंट सापडलेत, त्यातल्या एकानं कुठेही विदेशात प्रवास केलेला नाही. त्यामुळेच त्याला ओमिक्रॉनची लागण कुठून झाली हा मोठा सवाल आहे.
ज्या 2 रूग्णांना ओमिक्रॉन असल्याचं स्पष्ट झालंय त्यापैकी एक 66 वर्षीय पुरुष आणि दुसरा 46 वर्षीय पुरुष आहे. थकवा आणि ताप जाणवल्याने त्यांनी कोरोना टेस्ट केली. यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती आहे. दोघांनाही ओमिक्रॉनचे माईल्ड सिम्पटम्पस असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.
बंगळुरुतल्या दोन्ही रुग्णांचा विरोधाभासही समोर येतोय. जे पाच नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत ते डॉक्टरच्या संपर्कातले आहेत ज्याने कुठेही प्रवास केल्याची किंवा विदेशात गेल्याची नोंद नाही आणि जो पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून आलेला आहे, त्याचे प्रायमरी संपर्कात आलेले 24 जण आणि त्या 24 जणांच्या संपर्कात आलेले 240 जणांचा रिपोर्ट हा नेगेटीव्ह आहे.
जो ओमिक्रॉनच्या हाय रिस्क देशातून आला, त्याच्या संपर्कातला एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही आणि जो बंगळुरुतच होता, त्याच्या संपर्कातले पॉझिटिव्ह आलेले आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या नवीन प्रकाराने दार ठोठावल्यानंतर देशातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. याची भीती बाळगण्याऐवजी काळजी घेण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
पुढील दोन आठवडे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाना स्वतःला लॉकडाउन करून घ्यावं. दक्षिण आफ्रिके ओमिक्रॉनचा अधिक संसर्ग हा लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये झाला आहे. यामुळे पालकांनी मुलांची खबरदारी घ्यावी, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“…त्यावेळी ईडी कार्यालयात जाण्याचा सल्ला मीच शरद पवारांना दिला होता”
“…त्यावेळी ईडी कार्यालयात जाण्याचा सल्ला मीच शरद पवारांना दिला होता”
मंत्री नवाब मलिक यांचा खळबळजनक दावा, म्हणाले…
“कंगनाच्या स्वागतापेक्षा ममतांचं स्वागत नक्कीच चांगलं”
‘पुढील 2 आठवडे भारतासाठी खूप महत्वाचे’; Omicron बाबत तज्ज्ञांनी दिली ही महत्त्वाची माहिती