वर्धा | महाराष्ट्रात शरद पवार यांचे नाव जाणता राजा म्हणून अनेक वर्ष गाजले. मात्र त्यांनी कुटुंब मोठं करण्यापलिकडे काही काम केलं नाही. पण त्यानंतर देशाचा आणि महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास पंतप्रधान मोदींनी केला. छत्रपती शिवरायांनंतर खरा जाणता राजा कोणी असेल तर त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी, असं वक्तव्य माजी भाजप खासदार हंसराज अहिर यांनी केलं आहे.
वर्ध्यात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. बॅचलर रोडवर होणाऱ्या सावरकरांच्या पुतळ्याच्या भूमीपूजनाप्रसंगी पत्रकारांसोबत अहिर यांनी संवाद साधला.
पंतप्रधान मोदी यांनी देशाची गरज काय ओळखून त्यांनी देशाच्या विकासाची कामं हाती घेतली. जाणता राजा हा शब्द सर्वांना लागू होत नाही, खरे जाणते राजे आमचे नेते मंडळी आहेत, असं अहिर म्हणाले.
देशाच्या सीमा सुरक्षित करण्यापासून ते कृषीप्रधान देश करण्यापर्यंत मोदींनी कामं केली. लोकसंख्या पाहून मोदींनी कामं हाती घेतली, म्हणून देशाचा खरा जाणता राजा कोणी असेल छत्रपती शिवरायांनंतर त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी, अशी पुष्टी त्यांनी पुढे जोडली.
राष्ट्रवादीतील मंडळी मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची कार्यशैली पाहून भाजपमध्ये येत आहे. कोण कोणाला सोडत आहे याला महत्व नाही. येणारे मोदींची कार्यशैली पाहून भाजपमध्ये येत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
विधानसभा निवडणुकीबाबत मनसेच्या बैठकीत मोठा निर्णय! https://t.co/AyUVZIpu1w @mnsadhikrut @RajThackeray
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 13, 2019
‘पाॅलिटिक्स विथ रिस्पेक्ट’; आमदार महेश लांडगे यांचा एक चांगला पायंडा – https://t.co/f5LCCnzaSd @MLAMaheshLandge
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 13, 2019
…म्हणून दारुच्या बाटल्यांचा हार घालून मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार; तृप्ती देसाईंचा इशारा – https://t.co/jDBdkoqKvj @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 13, 2019