शतकी खेळी नंतर हनुमा विहारी भावनिक; म्हणतो…

किंग्स्टन : दुुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारताने आपला पहिला डाव 416 धावांवर आटोपला. दुसऱ्या दिवसाखेर विंडीजची पहिल्या डावात 7 बाद 87 अशी अवस्था झाली. हनुमा विहारीने आपले पहिले कसोटी शतक पुर्ण केले. या शतकी खेळीनंतर त्याने भावूक प्रतिक्रिया दिली आहे.

जसप्रीत बुमराहने हॅटट्रीक घेत दुसऱ्या कसोटी सामन्यावर आपली पकड मजबूत करण्यास भारताला मदत केली. वेस्ट इंडिजचे सात पैकी सहा गडी बुमराहने माघारी धाडले. 

मी १२ वर्षांचा असताना माझ्या वडिलांचे निधन झाले, त्यामुळे मी मनात असं ठरवलं होतं की जेव्हा मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळेन तेव्हा मी वडिलांसाठी काहीतरी करून दाखवेन. आज मी कसोटी क्रिकेटमध्ये पहिले शतक ठोकले आहे, त्यामुळे मी हे शतक माझ्या वडिलांना समर्पित करत आहे, अशा प्रकारे विहारीने भावूक प्रतिक्रिया दिली. 

दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मी 42 धावांवर नाबाद होतो. दुसऱ्या दिवशी मैदानावर जाऊन मोठी धावसंख्या उभारायची हे माझ्या डोक्यात होतं. त्यामुळे त्या रात्री मला नीट झोप लागली नाही. पण दुसऱ्या दिवसाच्या खेळात शतक ठोकल्यानंतर फार चांगलं वाटलं, असंही विहारी म्हणाला. 

महत्वाच्या बातम्या-