मुंबई | शरद पवारांना मुख्यमंत्री होण्यापूर्वी 40 गोष्टी लिहून काढल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात त्या पूर्ण केल्या. मला हे प्रमोद महाजन यांनी सांगितलं होतं, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. एका माध्यमाला दिलेल्या ते मुलाखतीत बोलत होते.
शरद पवार तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. या तीन टर्ममध्ये त्यांनी 40 पैकी 38 गोष्टी पूर्ण केल्या होत्या. असं त्यांच्याकडे व्हिजन होतं. असं व्हिजन उद्धव ठाकरे यांच्याकडं आहे का? हे पूर्ण व्हिजन अजित पवारांकडे आहे का?,’ असा सवाल उपस्थित करत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला.
मला माझा पक्ष आहे. त्यांना त्यांचा पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांनी मला रजिस्टर सावकारी आणि सावकारी यातील फरक सांगावा. हे तुम्हाला माहिती नसतं, तेव्हा तुमच्या डोक्यात अजेंडाच नसतो की सावकारी संपवायची आहे. असं डोकं अजित पवारांचं चालतं, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शरद पवारांकडे अजेंडा होता. देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही अजेंडा होता. तसा उद्धव ठाकरेंकडे नाही, असा दावाही पाटील यांनी केला.
महत्वाच्या बातम्या-
-मल्हारराव होळकरांच्या जयंतीनिमित्त राम शिंदेंकडून झाली ही मोठी चूक
-“…तसं आदित्य ठाकरेंना खुश करण्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचं भलं”
-ब्राम्हण समाजाला दुखवण्याचा माझा उद्देश नव्हता- नितीन राऊत
-“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकला”