टीम इंडियात नक्की चाललंय का?, विराटनंतर आता हार्दिक पांड्याचं खळबळजनक वक्तव्य

नवी दिल्ली | सध्या भारतीय क्रिकेट संघ मैदानात कमी आणि बाहेर जास्त गाजत आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर चालू झालेली गौप्यस्फोटांची मालिका चालूच आहे.

भारतीय क्रिकेट संघाला ट्वेंटी विश्वचषकात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला. तेव्हापासून भारतीय संघात सर्वकाही आलबेल नसल्याचं दिसत आहे.

भारतीय संघातून सध्या बाहेर असणारा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं खुप दिवसानंतर अनेक गोष्टींवर आपली मतं मांडली आहेत. पांड्यानं त्याच्या कामगिरीवर देखील प्रकाश टाकला आहे.

टी ट्वेंटी विश्वचषकासाठी आपली निवड ही अष्टपैलू म्हणून नाही तर फलंदाज म्हणून झाली होती, असा गौप्यस्फोट हार्दिक पांड्यानं केला आहे. परिणामी क्रिकेट जगतात खळबळ माजली आहे.

काही दिवसांपूर्वी भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी पांड्याच्या वक्तव्याच्या विपरित वक्तव्य केलं होतं. हार्दिक पांड्याचा समावेश संघात अष्टपैलू म्हणून केल्याचं शर्मा म्हणाले होते.

विश्वचषकात आम्ही ज्या स्थितीत होतो त्याची सगळी जबाबदारी आमच्यावर टाकण्यात आली. मला गोलंदाजी करायची नव्हती दुसऱ्या सामन्यात मी गोलंदाजी केली, असं पांड्या म्हणाला आहे.

आगामी काळात मी ऑलाराऊंडर म्हणून खेळण्यास उत्सुक आहे. मी सध्या पुर्णपणे बरा वाटत आहे. आता येणाऱ्या काळात काय होईल हे वेळच ठरवेल, असं सुचक वक्तव्यही पांड्यानं केलं आहे.

दरम्यान, हार्दिक पांड्याच्या वक्तव्यानं आता निवड समितीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. काही केल्या भारतीय क्रिकेटमधील वाद थांबायचं नाव घेत नाही हेच खरं.

महत्त्वाच्या बातम्या – 

 Budget 2022: बजेटशी संबंधित 10 रंजक गोष्टी, ज्या तुम्हालाही माहीत नसतील!

लव, सेक्स और धोखा: PUBG खेळताना तरूणीशी झाली मैत्री अन्…

 “लीडर होण्यासाठी कर्णधार असणं गरजेचं नाही”, अखेर किंग कोहलीने सोडलं मौन

“शिवसेनेशी आमची युती होण्याचा प्रश्नच नाही, सोनिया गांधी यांना… “

 ऑनलाईन-ऑफलाईनचा गोंधळ वाढला, विद्यार्थ्यांनी केला शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर राडा