गुजरातमध्ये काँग्रेसला जोर का झटका; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा

नवी दिल्ली | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातवर एकहाती सत्ता मिळवत देशाच्या राजकारणात आपली पकड मजबूत केली. काॅंग्रेसला मात्र त्याच गुजरातमध्ये मोठ्या गोंधळाचा सामना करावा लागत आहे.

काॅंग्रेस पाटीदार मतांच्या जोरवर सत्ता स्थापनेचं स्वप्न पाहात होती. पाटीदार आंदोलनाचा चेहरा आणि गुजरात काॅंग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पटेल नाराज असल्याच्या चर्चांना उत आला होता. आता या चर्चा अगदी खऱ्या ठरल्या आहेत. पटेल यांच्या राजीनामाच्या कारण एक पाटीदार नेते असल्याची सध्यातरी चर्चा आहे.

मोदी विरोधाच्या जोरावर आणि गुजरातमधील मोठ्या संख्येनं असलेल्या पाटीदार समाजाच्या आरक्षण आंदोलनानं हार्दिक पटेल चर्चेत आले होते.

हार्दिक पटेल यांची गेल्या काही महिन्यांपुर्वीच गुजरात काॅंग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली होती. पण राजीनामा देताना पटेल यांनी काॅंग्रेसच्या एकुण कार्यशैलीवर जोरदार टीका केली आहे.

गुजरातमध्ये यावर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका होणार आहेत. पटेल यांना काॅंग्रेस पक्ष मुख्यमंत्री पदाचा दावेदार बनवेल अशी अपेक्षा होती पण ती फोल ठरल्यानं पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये गत विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसनं भाजपला जोरदार टक्कर दिली होती. त्यानंतर मात्र काॅंग्रेसला पक्षांतर्गत बंडाळीचा सामना करावा लागला आहे.

पाहा ट्विट – 

 

महत्त्वाच्या बातम्या – 

 सहाव्या राज्यसभा जागेवरून संजय राऊतांचा इशारा, म्हणाले…

 “जगू द्याल की नाही?”; राज ठाकरेंचा संतप्त सवाल

 संभाजीराजेंचा राज्यसभा मार्ग खडतर?, शिवसेनेनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल

अण्णा हजारेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, दिला ‘हा’ गंभीर इशारा

रोहित पवारांच्या खोचक टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…