मुंबई | राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीवरुन चर्चा रंगल्या आहेत. तर काही पक्षांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे.
काॅंग्रेसमध्ये राज्यसभा उमेदवारीवरुन नेत्यांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे. राज्यसभेचा उमेदवार म्हणून महाराष्ट्राबाहेरचे इम्रान प्रतापगडी यांना निवडल्यानं काॅंग्रेसचे महासचिव आशिष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
डाॅ. आशिष देशमुख यांनी काॅंग्रेसचे महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अशातच आणखी एक बातमी समोर आली आहे.
काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले गुजरातचे नेते हार्दिक पटेल लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं माहिती समोर आली आहे.
हार्दिक पटेल हे 2 जून रोजी भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थित पक्षात प्रवेश करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी ! राज ठाकरे रुग्णालयात दाखल
“उद्धव ठाकरेच 25 वर्षे मुख्यमंत्री राहतील”; सुप्रिया सुळेंना राऊतांचं प्रत्युत्तर
काॅंग्रेसमध्ये राज्यसभा उमेदवारीवरुन नाराजी, महासचिवांचा राजीनामा