Russia Ukraine War: स्पेशल विमानाने हरजोत सिंह भारतात परतणार; पाहा व्हिडीओ

मुंबई | सध्या युक्रेन आणि रशिया युद्धामुळे (Russia Ukraine War) जगाचं टेन्शन वाढलंय. युक्रेनमध्ये सध्या अनेक विदारक गोष्टी पहायला मिळत आहे. युक्रेनच्या अनेक महत्त्वाच्या शहरांना रशियाने टार्गेट केलं आहे.

युक्रेनमध्ये अडकलेले अनेक भारतीय सध्या मायदेशात येण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी आता भारत सरकारने ऑपरेशन गंगा मोहीम राबवली आहे.

भारताचे चार मंत्री आता युक्रेनच्या बाॅर्डरवर भारतीयांच्या मदतीसाठी उभे आहेत. अशातच आयटी स्पेशालिस्ट असून उच्च शिक्षणासाठी युक्रेनला गेलेल्या हरजोत सिंहला काही दिवसांपू्र्वी गोळी लागली होती.

27 फेब्रुवारीला हरजोत सिंह मित्रांसोबत युक्रेनची राजधानी कीवमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्याला 4 गोळ्या लागल्या. छाती आणि पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला.

एवढंच नाही तर तेथील चेंगराचेंगरीत त्याचा पासपोर्टही हरवला होता. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने त्याला रूग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर भारत दूतावासाशी संपर्क झाल्यानंतर त्याला आता भारतात सुखरूप आणण्यात आलंय.

हरजोत सिंग यांचे विमान दिल्लीजवळील हिंडन हवाई तळावर सायंकाळी 7 वाजता उतरणे अपेक्षित आहे. आणखी 200 भारतीयांना देखील पोलंडमार्गे परत आणले जात आहे.

या विशेष विमानासह वी के सिंह देखील भारतात परत येऊ शकतात. मी देशाला खात्री देतो की तो सुरक्षित हातात आहे. मी त्याला माझ्या कुटुंबासह पुन्हा पाहण्यास उत्सुक आहे, असं वी के सिंह म्हणाले आहेत.

दरम्यान, आशा आहे की तो लवकर बरा होईल, अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

पाहा व्हिडीओ-

dolon
महत्वाच्या बातम्या- 

ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; वाचा आजचे ताजे दर

नवाब मलिकांना दिलासा नाहीच! कोर्टानं ‘या’ तारखेपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी

आत्ताची सर्वात मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाचं विधेयक अधिवेशनात मंजूर

“…तर अजित दादांना फासावर लटकवाल का?”

‘…तर मी विधानसभेतच फाशी घेईल’; रवी राणा भडकले