…म्हणून भाजपचं सरकार आलं तरी मला शांत झोप लागत होती!

मुंबई | काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ते भाजपात डेरेदाखल झाले. प्रवेशावेळी मात्र मुख्यमंत्री फडणवीस, हर्षवर्धन पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार राजकीय टोलेबाजी पहायला मिळाली.

मन मोकळे असले आणि सकारात्मक भूमिका असली तर काही अडचण येत नाही. भाजपचे सरकार असतानाही रोज रात्री मला शांत झोप लागत होती. कारण माझ्यावर कोणताही डाग नाही, असं मिश्किल विधान हर्षवर्धन पाटील यांनी केलं.

दुसरीकडे तुम्ही भाजपत प्रवेश करायला जरा उशीर केला. अगोदरच जर भाजपत प्रवेश केला असता तर आज तुम्ही बारामतीचे खासदार असते, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.

हर्षवर्धन पाटील यांनी अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. त्यांच्या राजकीय चातुर्याचा आणि अनुभवाचा भाजपा फायदा होईल आणि हर्षवर्धन पाटील यांच्या रूपाने जिंकणारी आणखी एक जागा आमच्याकडे आली, असं मुख्यमंत्री म्हणाले.

काँग्रेस सोडताना आणि भाजपात प्रवेश करण्याच्या वेळीही हर्षवर्धन यांनी पवारांना सोडलं नाही. सगळं काही बदलता येतं पण शेजारी बदलता येत नाही, असं म्हणत त्यांनी पवारांवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या-