औरंगाबाद महाराष्ट्र

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा, नाहीतर राजीनामा देतो- आमदार हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद : उद्या दुपारी चार वाजेपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा. नाहीतर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो, असा इशारा शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे.

हर्षवर्धन जाधव कन्नडचे आमदार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी ते आक्रमक झाले आहेत. 

मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे आंदोलनर्त्यांनी मराठा आमदारांना लक्ष्य केलं होतं. आमदार जाधव यांनी पुढाकार घेत मराठा आरक्षणासाठी लढा देण्याची घोषणा केली आहे. 

मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यासंदर्भात राज्य सरकार अध्यादेश काढू शकते, मात्र त्यात वेळकाढूपणा होत असल्याने समाजात असंतोष पसरला आहे, असंही ते म्हणाले.

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री पंकजा मुंडे एका दिवसात 50 अध्यादेश काढू शकतात, मग सरकारला मराठा आरक्षणाचा एक अध्यादेश का काढता येत नाही?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. 

IMPIMP