मोठी बातमी! ‘या’ माजी आमदाराला पुणे पोलिसांकडून अ.टक

पुणे | काल रात्री केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अ.टक करण्यात आली आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या अ.टकेनंतर कालपासून समर्थकांमध्ये एकंच खळबळ उडाली आहे.

हर्षवर्धन जाधाव यांनी पुण्यात एका छोट्या अपघाताच्या वादातून दुचाकीवरून जाण्याऱ्या व्यक्तीला मारहाण केली होती. यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात अमन चड्डा यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अमन चड्डा यांनी तक्रारीत जाधव यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

अमन चड्डा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, पुण्यातील औंध भागातून माझे आई वडील दुचाकीवरून चालले होते. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या गाडीचा अचानक दरवाजा उघडला आणि माझ्या आई वडिलांचा अपघात झाला. या अपघातात आई गंभीर जखमी झाली आहे.

वडिलांचीही नुकतीच एन्जीओप्लास्टी आणि ओपन हार्ट ऑपरेशन झालेले आहे. हर्षवर्धन जाधवांना हे सर्व सांगूनही ते माझ्या वडिलांना छातीवर बुक्क्या व लाथांनी मारहाण करत राहिले आणि त्यांना ठा.र मा.रण्याचा प्रयत्न केला.

तसेच हर्षवर्धन जाधव यांच्याबरोबर असलेली महिला इशा झा यांनी देखील शिवीगाळ केली आणि माझ्या आई वडिलांना मा.रहाण केली. माझ्या आईला लाथ मारून तिला ढकलून दिले. यामुळे आईच्या पायालाही गंभीर दुखापत झाली आहे, असंही अमन चड्डा यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

अमन चड्डा यांनी तक्रार दाखल केल्यानंतर काल रात्री पुणे पोलीस हर्षवर्धन जाधव यांना अ.टक करण्यासाठी गेले. मात्र, पोलीस अ.टक करण्यासाठी आल्यानंतर जाधव यांनी छातीत दुखत असल्याचं कारण सांगितलं. यानंतर पोलिसांनी जाधव यांची ससून रुग्णालयात तपासणी करून त्यांना रितसर अ.टक केली.

मंगळवारची संपूर्ण रात्र जाधव यांना तुरुंगातच काढावी लागली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल. न्यायालयात जाधव यांना हजर केल्यानंतरच त्यांना जामीन मिळतो की नाही, हे समजेल.

महत्त्वाच्या बातम्या-

सारा अली खानचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, वरून धवनसह रणवीर सिंगनं देखील केलं ट्रोल!

चंद्रकांत पाटील भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार? भाजप नेते म्हणाले…

हिवाळी अधिवेशनातील वातावरण तापलं! मुनगंटीवारांचं ‘ते’ चॅलेंज स्विकारत अजित पवार म्हणाले…

पीएम उज्ज्वल योजनेंतर्गत 3200 रुपये भरून एक लाखाचं कर्ज मिळणार? वाचा सविस्तर

कॉंग्रेसला आणखी मोठा झटका! ‘हा’ दिग्गज नेता राजकारणातून संन्यास घेणार?